Tuesday, 18 June 2019

‘लाल बत्ती’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेतील अभिनेता मंगेश देसाई यांचे ‘लाल बत्ती’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर  चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि त्यातच या चित्रपटाचा उत्कंठावर्धक टीही नुकताच प्रदर्शित झाला असून समाजमाध्यमां मध्ये या टीझरविषयी चर्चा रंगत आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या QRT टीमविषयी (क्विक रिस्पॉन्स टीम) या टीर मधून सांगण्यात आले आहे. QRTटीमला देण्यात येणारे खडतर प्रशिक्षण यात दाखवण्यात आले आहे. जिगरबाज पोलिसाची कहाणी उलगडणारा ‘लाल बत्ती’ चित्रपट लढण्याची प्रेरणा देणार आहे.
लाल बत्ती चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुलेतेजसरमेश वाणीमीरा जोशीअनिल गवसमनोज जोशी या कलाकारांच्या भूमिका आहेत.
साई सिनेमा’ ची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली आहे. दिग्दर्शन गिरीश मोहिते यांचे आहे. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवाद लेखन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर निलेश गावंड यांच्याकडे संकलनाची जबाबदारी आहे. चित्रपटाच्या कथेला साजेसं अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभले असून चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर यांचे असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
‘लाल बत्ती’ २६ जुलैला प्रदर्शित होणार आहे.
लिंक  - https://youtu.be/Crexik5kSwk

No comments:

Post a Comment