मुंबई १३ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसीसाठी उमेदवार निवडण्याचे बिग बॉस यांनी सदस्यांवर कार्य सोपावले होते... या कार्यात सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद झाले, मतभेद, भांडण झाली... आणि अखेर या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी दोन उमेदवार मिळाले... या आठवड्यामध्ये “म्हातारीचा बूट” हे कॅप्टनसी कार्य शिव आणि किशोरी शहाणे मध्ये रंगणार आहे... आता हा टास्क सदस्य कसा पार पाडतील आणि घराचा कॅप्टन होण्याचा मान कोण पटकावणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
टास्क दरम्यान शिव आणि आरोहचा वाद होणार आहे... आरोह म्हणाला,”काही ताकद नाहीये त्याच्यामध्ये फुसका आहे तो”. वीणाचे म्हणणे पडले “दादागिरी नाही करायची”... आरोहचे म्हणणे आहे प्रत्येक टास्कमध्ये हेच होत, मी नाही खेळणार टास्क”. बघूया पुढे काय होईल टास्कमध्ये.
No comments:
Post a Comment