मुंबई ९ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज बिचुकले आणि हीनामध्ये एक चर्चा रंगली आहे... आता ही चर्चा कोणाबद्दल ? का रंगली आहे ?कशावरुन सुरू झाली ? हे तुम्हाला कळेलच... पण कोणाबद्दल रंगली आहे हे नक्कीच सांगू शकतो... शिवानी सुर्वेबद्दल बिचुकले हीनाला काही गोष्टी सांगत आहेत... अभिजीत बिचुकले यांचे म्हणणे आहे, “कोणीही इथे हसत नाहीये खेळत नाहीये... माझ्याबरोबर जे होत ते मी बोलतो... आता ही येडी सरकिट, कोण शिवानी... तिला आणली इथे ती गोड बोलत बसली माझ्याशी हो की नाही ? म्हणजे हम मै कुछ है, नही तो उसको हँडल करना गंदी बात है... हीनाने त्यावर त्यांना सांगितले मुश्कील बात है... बिचुकले पुढे म्हणाले मुश्किल मे आता है इसके साथ बात करना... “जो कोणी करेल शिवानीशी गप्पा गोष्ट त्याचा मेंदू होईल भ्रष्ट”... तरीपण मी तिला हसवल, तिच्या नादाला लागणे म्हणजे .....”
आता अभिजीत बिचुकले अस का बोलले ? अस बोलण्यामागे कोणता हेतु होता ? कशावरुन ही चर्चा सुरू झाली ? शिवानी आणि बिचुकले यांचे कुठल्या विषयावरून वाद नाही, गैरसमज नाही तरी बिचुकले यांना असे का वाटते ? हे आज कळेलच... जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment