Friday, 9 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – सदस्य शोधू शकतील १० लाख रुपये ?


 
मुंबई ९ ऑगस्ट, २०१९ : आज घरातील सदस्यांना एक महत्वाचे कार्य मिळणार आहे... सदस्यांनी एक खून माफ या नॉमिनेशन कार्यामध्ये गमावलेले ९ लाख ७५ हजार रुपये सदस्य पुन्हा मिळवू शकतील... आणि यासाठीच संजय नार्वेकर यांनी घरातील सगळ्या सदस्यांना सांगितले तुम्ही टास्क मध्ये ९ लाख ७५ हजार रुपये गमावले… १० लाख रुपये याच घरामध्ये आहेत जर तुम्ही ते शोधले तर ते पैसे तुम्हाला मिळतील... सगळे सदस्य आता ते पैसे कुठे लपवले असतील हे शोधण्यासाठी घरातील प्रत्येक कोपरा शोधत आहेत... संजय नार्वेकर यांनी पैशांची सुटकेस गादीच्या खाली लपवली आहे. विजेत्याला मिळणारी रक्कम ही खूप महत्वाची असते आणि आता गमवलेली रक्कम पुन्हा मिळवण्याची संधी सदस्यांना मिळाली आहे... आता बघूया सदस्य हे पैसे मिळवू शकतील की नाही ? हे आज कळलेच...
तेंव्हा बघा बिग बॉस मराठी सिझन 2 आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment