झी टॉकीज आणि एखाद्या झकास मराठी चित्रपटाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' हे समीकरण आता सगळ्यांनाच ठाऊक झालेले आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या रविवारी, म्हणजेच २५ तारखेला सुद्धा, अशाच एका खास चित्रपटाचा प्रीमियर ही वाहिनी सर्वांसाठी घेऊन येत आहे. झी टॉकीजवरील प्रीमियर, ही नेहमीच प्रेक्षकांसाठी एक मोठी पर्वणी असते. 'सत ना गत' हा चित्रपट सुद्धा याला अपवाद नसेल. त्यामुळेच येत्या रविवारी सुद्धा भरपूर मनोरंजनासाठी तयार रहा.
नामी या एका रूपवान स्त्रीची ही कथा आहे. नाकर्ता नवरा आणि पदरात दोन मुलं, असा संसार ती एकट्याने सांभाळते आहे. तिचे सौंदर्य हा संपूर्ण गावाकरिता चर्चेचा विषय झालेला आहे. अशातच, एका पोलीस अधिकाऱ्याने नामीचा बलात्कार केल्यामुळे तिचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. तिला न्याय देण्याचा प्रयत्न करणारा एक स्थानिक पत्रकार, ते स्थानिक वर्तमानपत्र आणि त्या भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याला वाचवू पाहणारे राजकारणी व इतर पोलीसमंडळी, यांच्यातील संघर्षाला इथून सुरुवात होते. आशा स्थितीत या अबला स्त्रीला साधा न्याय मिल्ने सुद्धा अशक्य होऊन बसते. यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात; जे आजच्या जीवनातील अनेक स्त्रियांची स्थिती वर्णन करण्यासाठी पुरेसे आहेत. भ्रष्ट पोलीस व राजकारणी यांचा सामना करत न्याय मिळवण्याचा प्रयत्न करणारी नामी, यात यशस्वी होईल का? की तिच्यावर झालेला अन्याय, हा केवळ एक राजकारणाचा विषय बनून राहील? ज्याचा आपल्या फायद्यासाठी पुरेपूर वापर करत राजकारणी, आपली झोळी भरून घेतील. हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका, 'सत ना गत'!!
रविवार, २५ ऑगस्ट रोजी, दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, झी टॉकीजवर हा चित्रपट पाहता येईल.
No comments:
Post a Comment