Friday 3 January 2020

संजय जाधव आणि दिपक राणे ह्यांच्या प्रॉडक्शन हाऊसने पूर्ण केली यशस्वी 6 वर्षांची वाटचाल

फिल्ममेकर जोडगोळी संजय जाधव आणि दिपक राणे ह्यांनी आपल्या ड्रिमींग ट्वेंटि फोर सेव्हन’ ह्या निर्मिती संस्थेची 3 जानेवारी 2013ला स्थापना केली. ह्या निर्मितीसंस्थेने दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तु हि रे, गुरू, लकी आणि खारी बिस्किट अशा सिनेमांची निर्मिती केली. तसेच आपल्या निर्मिती संस्थेव्दारे संजय जाधव आणि दिपक राणे ह्यांनी दिल दोस्ती दुनियादारी, फ्रेशर्स, दुहेरी, अंजली, दुनियादारी फिल्मीस्टाइल अशा मनोरंजक मालिकांचेही निर्माण केले.
आपल्या सहा वर्षांच्या मनोरंजक प्रवासाचा मागोवा घेताना ड्रिमींग ट्वेंटि फोर सेव्हनचे निदेशक दिपक राणे म्हणाले, मनोरंजन क्षेत्रामूळे माझी आणि दादाची(संजय जाधव) ओळख झाली. मराठी चित्रपटसृष्टीत काही वेगळे करायची, पॅशन आणि क्वालिटी वर्क करायचा ध्यास हा आमच्या मैत्रीतला कॉमन धागा होता. त्यामूळेच मग आम्ही आमच्या निर्मितीसंस्थेची उभारणी केली. आणि गेली सहा वर्ष ड्रिमींग ट्वेंटि फोर सेव्हन’ निर्मितीसंस्थेची घोडदौड यशस्वीरित्या चालू असण्याचा एक वेगळाच आनंद हा वर्धापनदिनाचा छटकार मारताना होतोय.
ड्रिमींग ट्वेंटि फोर सेव्हन’ ह्या निर्मितीसंस्थेप्रमाणेच ड्रिमर्स पीआर आणि मार्केटिंग ह्या टॅलेंट मॅनेजमेंट एजन्सीलाही सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मराठी सिनेसृष्टीत टॅलेंट मॅनेजमेंटमधली पहिली एजन्सी असण्याचा मान ड्रिमर्स पीआर एन्ड मार्केटिंगला जातो. ह्याविषयी दिपक राणे सांगतात, जसे बॉलीवूड किंवा इतर इंडस्ट्रीजमध्ये सेलिब्रिटींचे मॅनेजर, पीआर, स्टाइलिस्ट, सोशल मीडिया सांभळणारी अशी मोठी टिम असते. तशीच प्रोफेशनल टिम आपल्या मराठी सेलिब्रिटींनाही मिळावी. असा ड्रिमर पीआरच्या स्थापने मागचा असण्याचा हेतू होता. आणि आज ड्रिमर्स पीआरच्या सहा वर्षांच्या यशस्वी वाटचालीनंतर हा हेतू साध्य झाल्याचा आनंद आहे.”  
फिल्ममेकर संजय जाधव म्हणाले, मी आणि दिपक राणे ह्यांनी सहा वर्षापूर्वी एक स्वप्न पाहिले होते. पण स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आम्हांला सक्षम टिम मिळाली आहे, ह्याचा आनंद ती स्वप्नपूर्ती अनुभवताना होतो आहे. सहा वर्षाच्या प्रवासात अनेक चढ-उतारांना आणि यशापयाशाला आम्ही एकत्र मिळून सामोरे गेलो. ड्रीमींग ट्वेंटि फोर सेव्हन आणि ड्रिमर्स पीआर एन्ड मार्केटिंग ह्यापूढेही यशाची अनेक शिखरं पादाक्रांत करत राहिल, आणि मनोरंजन क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी आपले योगदान देत राहिल.”   

1 comment:

  1. Urgent need female for Egg donation with the sum of $500,000.00 3 crore,Email: jainhospitalcare@gmail.com
    whatsapp +91 9945317569

    ReplyDelete