प्रेक्षकांची सर्वाधिक लाडकी आणि अत्यंत लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज, आज एक दशकाहून अधिक काळ सर्वांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षकांसाठी दर्जेदार सिनेमे, नाटकं, उत्तमोत्तम कार्यक्रम नेहमी प्रक्षेपित केले जातात. यातीलच एक अप्रतिम उपक्रम म्हणजे, 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'! वैशिष्ट्यपूर्ण आणि उत्कृष्ट चित्रपटांचे 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' रविवारी वाहिनीवर करण्यात येतात. येत्या रविवारी सुद्धा अशीच एक खास मेजवानी प्रेक्षकांसाठी 'झी टॉकीज'वर असणार आहे. 'ट्रिपल सीट' या सिनेमाचा 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर' वाहिनीवर होणार आहे.
'ट्रिपल सीट' हा सिनेमा तन्वी (शिवानी सुर्वे), कृष्णा (अंकुश चौधरी) आणि वृंदा (पल्लवी पाटील) या तिघांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित आहे. कृष्णा हा एक समंजस आणि संस्कारी मुलगा आहे. मदतीची गरज असलेली व्यक्ती ओळखीची असो अथवा अनोळखी असो, तो नेहमीच मदतीसाठी तत्पर असतो. तन्वीने कृष्णाला दिलेल्या मिसकॉलने या कथेला सुरुवात होते. यातून तन्वी आणि कृष्णा यांची मैत्री होती. ती दिवसेंदिवस फुलत जाते. आपल्या आयुष्यातील सुखदुःख एकमेकांना सांगणं, रोज फोनवर गप्पा मारणं, या गोष्टींमधून त्यांची ही मैत्री घट्ट होते. या गोष्टी घडत असताना, अचानक कृष्णा आणि वृंदाचा साखरपुडा होतो. सगळ्यांचं मन जपण्याचा प्रयत्न कृष्णा नेहमी करत असतो. त्याच्यासमोर हा इतका मोठा पेचप्रसंग याच स्वभावामुळे उभा राहिलेला आहे.
त्यांनतर, एका मोठ्या गैरसमजातून कृष्णा आणि तन्वी यांचं लग्न लावून दिलं जातं. त्याचा वृंदाशी झालेला साखरपुडा मोडतो.
या सगळ्या परिस्थितीला कृष्णा कसं तोंड देतो, त्यातून कसा मार्ग काढतो हे 'ट्रिपल सीट' या सिनेमात पाहायला मिळेल.
या तिघांच्या गोंधळाची ही गमतीशीर कहाणी अनुभवण्यासाठी, पाहायला विसरू नका, 'ट्रिपल सीट', येत्या रविवारी २६ तारखेला दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी टॉकीज'वर!!!
No comments:
Post a Comment