Saturday 4 January 2020

अशोक सराफ यांचा ‘डिजिटल प्रवास’

अभिनयाच्या दमदार प्रवासानंतर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नव्या वर्षात डिजिटल प्रवास सुरु होतोय. आगामी प्रवास या  चित्रपटाच्या निमित्ताने अशोक सराफ हे सोशल मिडीयावर सक्रीय झाले आहेत. 
आपल्या या नव्या प्रवासाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलं की‘’आता नवीन वर्ष म्हटल्यावर काही तरी नवा संकल्प करायलाच पाहिजे आतापर्यंत मी सोशल मिडीया या विषयापासून लांब होतो.. माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्याच्या प्रवासात तेच शेष राहिलं होतं आणि म्हणूनच आता तुम्हाला माझ्यासोबत थेट बोलता यावंयासाठी मी माझं @ashoksarafofficial हे अधिकृत इंस्टाग्राम प्रोफाईल तयार केलं आहे.’’ विशेष म्हणजे शशांक उदापूरकर लिखित-दिग्दर्शित ‘प्रवास’ या आपल्या आगामी चित्रपटाविषयी अशोक मामांनी या माध्यमातून चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधत, प्रश्नांची दिलखुलास उत्तरंही दिली.
चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेण्याचा ट्रेंड चांगलाच रुजलाय. प्रवास चित्रपटाच्या निमित्ताने माझा सोशल  प्रवास सुरु होतोय असं म्हणायला हरकत नाही असं सांगतया नव्या डिजिटल प्रवासाच्या निमित्ताने चाहत्यांशी कनेक्ट राहता येईल याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. 

No comments:

Post a Comment