Friday 24 January 2020

Zee Yuva | Dr.Don | आता तोडायचं नाही जोडायचं ! डॉक्टर डॉन चा मनोरंजनाचा फंडा !!

आता तोडायचं  नाही  जोडायचं ! डॉक्टर डॉन चा मनोरंजनाचा फंडा  !!
'झी युवा' वाहिनी, तरुणाईला आवडतील अशा उत्तमोत्तम मालिका आणि कार्यक्रम प्रेक्षकांसाठी घेऊन येते. विविध दर्जेदार मालिका, कथाबाह्य कार्यक्रम सुद्धा  'झी युवा'वर पाहायला मिळतात. फुलपाखरू, फ्रेशर्स, लव लग्न लोचा, बन मस्का या मलिकांपासून ते सध्या सुरू असलेल्या साजणा, प्रेम पॉयजन पंगा अशा निरनिराळ्या मालिका, 'युवा सिंगर एक नंबर', 'युवा डान्सिंग क्वीन' या स्पर्धा, मेहफिलसारखा संगीतावर आधारित कार्यक्रम, असे नानाविध कार्यक्रम या वाहिनीवर प्रेक्षकांनी  आजपर्यंत पाहिले आणि प्रेक्षकांना  ते आवडलेही. आता  'झी युवा'वर लवकरच आणखी एक उत्कृष्ट मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या नव्या मालिकेचे नावदेखील अत्यंत निराळे आहे. डॉक्टर  डॉन  !
'झी युवा' वाहिनी, 'डॉक्टर डॉन' नावाची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते आहे. ही मालिका हलकीफुलकी आणि विनोदी धाटणीची असणार आहे. या मालिकेतून, अभिनेता देवदत्त नागे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. तो एका निराळ्या भूमिकेत आणि खास लुकमध्ये दिसणार आहे. नुकताच  पहिला टिझर प्रदर्शित  झाला. प्रेक्षकांना याची झलक पाहायला मिळालेली आहे. देवदत्त नागे एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे, त्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्याच्या पुनरागमनाविषयी असलेली उत्सुकता अधिक वाढलेली आहे. प्रोमोमध्ये देवदत्त नागे एका गुंडाच्या मागे धावताना दिसतो आहे. त्याच्या हातात एक पिस्तुल आहे. त्याच्या हातातील पिस्तुल अचानक अदृश्य होते व त्या जागी स्टेथस्कोप दिसू लागतो. त्याचप्रमाणे त्याच्या अंगावरील कोट पांढऱ्या लॅबकोटमध्ये परावर्तित होतो, असे या प्रोमोमध्ये दिसते. देवदत्तने जपलेल्या पोनीटेलमुळे, त्याचा लुक एकदमच झकास दिसतोय! हा डॉक्टर डॉन कशाप्रकारे हास्यउपचार आणि विनोदाचे फायरिंग करतो, ते पाहण्याची उत्सुकता आता सर्वांना लागून राहिलेली आहे.

No comments:

Post a Comment