दीपालीच्या साथीने गंगाचे पायही मंचावर थिरकले!!!
'झी युवा'वर सुरू असलेली 'युवा डान्सिंग क्वीन' ही स्पर्धा, अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झालेली आहे. १४ ललनांचा सहभाग असलेली ही स्पर्धा आता अधिक चुरशीची होऊ लागलेली आहे. परीक्षक मयूर वैद्य आणि सोनाली कुलकर्णी यांचा कस लागत आहे. स्पर्धकांच्या उत्तमोत्तम परफॉर्मन्समुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे. अद्वैत दादरकर याचे खुमासदार सूत्रसंचालन आणि स्पर्धकांमधील वाढलेली चुरस, यामुळे हा कार्यक्रम यशाची नवनवी शिखरे गाठत आहे. 'झी युवा' वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनवीन गोष्टी घेऊन येत असते. 'युवा डान्सिंग क्वीन'मधून होणारे प्रेक्षकांचे मनोरंजन सुद्धा याला अपवाद ठरलेले नाही.
गेल्या आठवड्यात, दीपाली नायगावकर हिने सादर केलेले नृत्य, हा आता चर्चेचा विषय ठरू लागलेला आहे. पेशाने लावणी नर्तिका असलेल्या दीपालीने 'जोगवा' या गाण्यावर आपला धमाकेदार परफॉर्मन्स केला. तिच्या या जबरदस्त सादरीकरणाने प्रेक्षक आणि परीक्षक खूपच खुश झाले. तिच्या दमदार नृत्याने सर्वांनाच अचंबित केले. दिपालीच्या दिलखेचक अदा, नृत्यातील सफाईदारपणा यामुळे हा डान्स सर्वोत्तम ठरला. या खणखणीत सादरीकरणाचा प्रभाव इतका होता, की नुकतीच खूप चर्चेत आलेली व 'युवा डान्सिंग क्वीन'चा एक अविभाज्य भाग असलेली गंगा सुद्धा त्यानंतर मंचावर अवतरली. तिने 'जोगवा'च्या गाण्यावर स्वतःचा जलवादेखील दाखवला. तिच्या अप्रतिम नृत्याचा प्रभाव सुद्धा प्रेक्षकांवर पाहायला मिळाला. आपल्या बहारदार सूत्रसंचालनाच्या जोरावर गंगाने आपली छाप पाडलेली आहेच; आता मंचावर आपल्या नृत्याची झलक सादर करण्यात सुद्धा ती कमी पडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.
अशाच गमतीजमती आणि भरपूर मनोरंजनासाठी, पाहायला विसरू नका, 'युवा डान्सिंग क्वीन', बुधवार ते शुक्रवार, रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या 'झी युवा' वाहिनीवर!!!
No comments:
Post a Comment