मुंबई, 13 ऑगस्ट २०२०: भारत सरकारने आयोजित केलेल्या मेगा हॅकेथॉन स्पर्धेचे विजेतेपद भारतातील वेगाने विकास साधणा-या तंदुरुस्तीविषयक अॅपपैकी एक असलेल्या स्टेपसेटगोने पटकावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ जुलै २०२० रोजी डिजिटल इंडिया आत्मनिर्भर भारत इनोव्हेशन चॅलेंज ही अॅपसंबंधी संशोधनाची स्पर्धा जाहीर केली होती. देशभरातील ६,९४० तंत्रज्ञान क्षेत्रातील नवउद्योजक आणि स्टार्टअप्सनी या स्पर्धेत भाग घेतला होता. सध्या नागरिक वापरत असलेल्या अॅप्सपैकी सर्वोत्तम भारतीय अॅप कोणते आहे आणि त्या-त्या विषयांतील कोणते अॅप आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वोत्तम कामगिरी करू शकेल, हे शोधणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता. आरोग्य आणि तंदुरुस्ती या विभागात स्टेपसेटगो हे अॅप विजयी ठरले.
शिवजित घाटगे, मिसाल तुराखिया आणि अभय पै यांनी जानेवारी २०१९ मध्ये स्टेपसेटगो हे स्टार्टअप सुरू केले होते. समाजाला तंदुरुस्त करण्यासाठी सुरू केलेल्या या अॅपच्या माध्यमातून केवळ तंदुरुस्त राहण्यासाठी वापरणा-याला काही बक्षिसे दिली जातात. भारतातील प्ले स्टोअरमध्ये आरोग्य आणि तंदुरुस्ती या विभागातील सर्वाधिक लोक वापरत असलेले अॅप म्हणून स्टेपसेटगो गणले जाते त्याचबरोबर त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे. ६ दशलक्ष नोंदणीकृत वापरकर्ते असलेले स्टेपसेटगो हे अॅप फिटनेस रिवॉर्डस् प्रकारातील बाजारपेठेतल्या आघाडीच्या अॅपपैकी एक ठरले आहे.
या यशाबद्दल स्टेपसेटगोचे सह-संस्थापक आणि सीईओ शिवजित घाटगे म्हणाले, “या स्पर्धेत यशस्वी झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आणि स्टार्टअपना आपले संशोधन जगासमोर सादर करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही सरकार आणि पंतप्रधानांचे आभार मानतो. स्टेपसेटगोने तयार केलेले उत्पादन ६ दशलक्ष वापरकर्त्यांच्या पसंतीस उतरले याचाही आम्हाला अभिमान वाटतो. ही तर आमची सुरुवात आहे, आमच्याकडे अनेक संशोधने तयार आहेत, जी आमच्या सध्याच्या आणि भविष्यातील ग्राहकांना वापरता येऊ शकतील. भारतात सुरू होणा-या तंदुरुस्तीच्या चळवळीमध्ये आम्ही संप्रेरक म्हणून काम करू शकू, अशी आमची आशा आहे.”
स्टेपसेटगो विषयी:
स्टेपसेटगो हा फिटनेस रिवॉर्डिंग प्लॅटफॉर्म आहे, लोकांनी आरोग्यपूर्ण जगावे यासाठी त्यांना सातत्याने प्रोत्साहन देण्यावर त्यांचा विश्वास आहे. अॅप वापरणारा दिवसात किती पावलं चालला किंवा चालली त्यानुसार हे अॅप त्याला बक्षीस देते. बक्षिसात मिळालेली SSG नाणी तुम्ही अॅपवर असलेल्या बाजारात खरेदी करण्यासाठी वापरू शकता. ६ दशलक्षांहून अधिक नोंदणीकृत वापरकर्ते असल्याने SSG हे अॅप तंदुरुस्तीशी संबंधित अॅपच्या बाजारपेठेतील आघाडीच्या अॅप्सपैकी एक झाले आहे. बजाज अॅव्हेंजर, शाओमी, बोट, स्केचर्स, प्युमा आणि डेकेथलॉन या महत्त्वाच्या ब्रँडशी अॅपने सहकार्य करार केला असून, या ब्रँडसह इतर ब्रँड्सच्या वस्तू वापरकर्त्यांना बक्षिसांतून मिळालेल्या नाण्यांतून खरेदी करता येतात, जेणेकरून त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी प्रेरणा मिळू शकते.
वेबसाईट:
Thanks a lot for sharing this excellent article. Visitors will feel enjoy finding important things in your content. I am happy for myself and visitors for sharing this article.
ReplyDeletebuy soundcloud plays
buy instagram likes
buy instagram accounts
buy google voice numbers