Wednesday 26 August 2020

‘आप्पा आणि बाप्पा’ ‘अॅमेझॉन प्राइम’ वर

सध्या सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाचे वेध लागले आहेत. गणेशोत्सवाच्या काळातल्या या क्षणांचा आनंद द्विगुणित करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचा आप्पा आणि बाप्पा हा धमाल  चित्रपट अॅमेझॉन प्राइम’ वर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.

मराठी माणसांचं आणि सणांचं हे वेगळं नातं आहे. पण अलीकडच्या काळात हे सण साजरा करण्याचे स्वरूप बदलत चाललेले दिसते आहे. धर्मसंस्कारविधी-परंपरानातेसंबध या संज्ञांना  तिलांजली देत गोंगाटी सादरीकरणाकडे आणि वारेमाप उधळपट्टी करण्याकडे जनसामान्यांचा कल दिसतोय. सण आणि उत्सवासंबंधीची आजची वास्तविकता यावर अतिशय मार्मिकपरखड तरीही मनोरंजक प्रकाशझोत आप्पा आणि बाप्पा या चित्रपटातून टाकण्यात आला आहे. दिलीप प्रभावळकरभरत जाधवसुबोध भावे यांच्यासोबत संपदा कुलकर्णीउमेश जगतापशिवानी रांगोळे आदि कलाकार या चित्रपटात आहेत.

आप्पा आणि बाप्पा थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची तुमची संधी हुकली असेल तर आता हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम’ वर नक्की पहा. 

No comments:

Post a Comment