Friday 7 August 2020

आदित्य सरपोतदार दिग्दर्शित 'झोंबिवली'चे मोशन पोस्टर प्रदर्शित; अधिक पटीने वाढणार चित्रपटाची उत्सुकता - The First Poster Of ‘Zombivli’ Created A Lot Of Curiosity Among The Fans, Now Presenting The First Motion Poster Of Marathi's First-Ever Zom-Com Film


काही दिवसांपूर्वी हॉरर-कॉमेडी या जॉनरचा 'झोंबिवलीया मराठी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते णि त्या ऑफिशिअल पोस्टरमुळे सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली. आपल्या मराठीत झोंबी पाहायला नक्कीच सर्वांना आवडेल आणि त्यांना पाहण्यासाठी उत्सुकता देखील वाढली असेल. आता प्रेक्षकांना झोंबीची छोटीशी झलक पाहायला मिळणार आहे कारण 'झोंबिवलीचित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. आतापर्यंत प्रेक्षकांनी हिंदी आणि इंग्रजी सिनेमात झोंबीज् पाहिले आहेत, पण 'झोंबिवली'च्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीमध्ये पण आता झोंबीज् पाहायला मिळणार आहेत.

मोशन पोस्टर हे सिनेमाप्रती उत्सुकता वाढवणार यात शंका नाही. झोंबींचे व्हिज्युअल, सुप्रसिध्द संगीतकार ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी दिलेले बॅकग्राऊंड म्युझिक, एकंदरीत मोशन पोस्टरचा इफेक्ट या सर्व गोष्टींसाठी प्रेक्षकवर्गांकडून पुन्हा एकदा चित्रपटाचे कौतुक होणार हे नक्की.

सारेगम प्रस्तुत 'झोंबिवली' चित्रपटाची निर्मिती Yoodlee Films यांनी केली आहे. तर सुप्रसिध्द सिने दिग्दर्शक आदित्य सरपोतदार दिग्दर्शित या चित्रपटात अमेय वाघललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०२१ ला प्रदर्शित होणार आहे.


A few days back the official poster of the new Marathi horror-comedy film ‘Zombivli’ was released which created a lot of curiosity among the fans and the media. Now leveraging the positive reactions that the poster got, the makers have released the motion poster of the first look. The Marathi film industry has evolved a lot in the past few years, with different kinds of films being made, especially for the youth. 'Zombivli' will give the viewers a taste of a Marathi horror comedy, featuring zombies. Zombies have till now made an appearance only in Hindi and English films but this will be a first for Marathi cinema.

The motion the poster itself looks very promising. The visual of zombies, the background music by noted musician Av Prafullachandra, and the effects make for an intriguing look into the world Zombivli. The movie has already created a buzz due to its unusual title and the subject matter.

The movie is presented by Saregama, and produced under their film studio arm - Yoodlee Films. Amey Wagh, Lalit Prabhakar & Vaidehi Parshurami will be seen in the lead and is directed by noted Marathi filmmaker Aditya Sarpotdar. The film releases in 2021.  

No comments:

Post a Comment