Thursday, 13 August 2020

Zee Talkies - Fatteshikast - चित्रपटातील भाषण अविस्मरणीय - चिन्मय मांडलेकर

'फत्तेशिकस्त’ या चित्रपटात शिवरायांच्या गनिमी काव्याचा रुपेरी विस्तार अधिक व्यापक आणि प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा पद्धतीने मांडणी केली आहेया चित्रपटाने प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळवून बॉक्सऑफिसवर देखील कामगिरी फत्ते केली.

फर्जंद’ या चित्रपटानंतर अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी फत्तेशीकस्त या चित्रपटात देखील महाराजांची भूमिका त्याच सहजतेने आणि तडफदार बाण्याने रंगवली आहेया भूमिकेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतलीलवकरच हा चित्रपट झी टॉकीज वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेया निमित्ताने या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे अविस्मरणीय किस्से सांगताना अभिनेता चिन्मय मांडलेकर म्हणाले, "फत्तेशिकस्त चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान खूप महत्वाच्या गोष्टी घडल्यात्यातली अविस्मरणीय गोष्ट म्हणजे आम्ही  राजगड वर केलेलं शूटिंगराज गडावर एक नेढे आहेत्या नेढ्यात बसून आम्ही एक सीन केला होताखूप उंचावर डोंगराच्या मधोमध आपोआप झालेलं एक भगदाड आहे तेमला उंच ठिकाणांची भीती आहेपण आम्ही तिथे जेव्हा शूटिंग केलं तेव्हा माझी संपूर्ण भीती निघून गेलीहा माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण होताअजुन एक म्हणजे मोहिमेवर निघण्याआधी माझं एक भाषण आहेते दिग्पालने ऐनवेळी बदललंआधीचं भाषण त्याला फारस आवडलं नव्हतंत्याने नंतर लिहलेलं भाषण फारच सुंदर होतंक्वचितच एखाद्या अभिनेत्याच्या वाट्याला इतकं सुंदर भाषण सिनेमामध्ये करण्याची संधी येतेत्याने ज्या कागदावर मला ते भाषण लिहून दिल  होतं त्यावर मी त्याची सही घेतली होतीअजूनही तो कागद मी जपून ठेवलेला आहे."

No comments:

Post a Comment