महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही अष्टपैलू आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. तिच्या अभिनय कौशल्याने तिने प्रेक्षकांची मनं जिंकली. २०१९ मध्ये फत्तेशिकस्त या चित्रपटात ती केसर या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आली. या भूमिकेसाठी तिने प्रचंड मेहनत घेतली, शिवकालीन भाषा आणि तलवार बाजीचं प्रशिक्षण देखील घेतलं. फत्तेशिकस्त मधली ही केसर आता झी टॉकीजवर प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. १६ ऑगस्टला या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीजवर होणार आहे. त्या निमित्ताने मृण्मयीने केसर बद्दलच्या काही आठवणी शेअर केल्या. ती म्हणाली, "फर्जंद नंतर लगेचच दिग्पालने फत्तेशिकस्तची जुळवा जुळव सुरु केली. मला माहित होतं की केसरची भूमिका मला परत करायला मिळणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक होते. त्याने मला सांगितलं होतं कि फत्तेशिकस्त मधील केसर थोडी वेगळी असणार आहे आणि त्यामुळे उत्सुकता अजुनच वाढली होती. फत्तेशिकस्त मधील केसर आणखी नवखी होती. तिने एखादी चूक जर केली तर त्याची किंमत तिला एकटीलाच नाही तर सर्वानाच भोगावी लोणार होती. अशा परिस्थितीमध्ये बहिर्जी नाईकांनी तिला सहभागी करून घेतल होतं. फत्तेशिकस्तमधील केसरची तयारी तशी फर्जंद पासूनच सुरु झाली होती. मी संहिता वाचल्यावर त्या भूमिकेची गाभा मला कळाला."
No comments:
Post a Comment