Monday, 10 August 2020

Zee Yuva - Dr. Don


डॉक्टर डॉन मध्ये देवदत्त नागे थिरकला गोविंदाच्या तालावर...

जय मल्हार या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःची वेगळी जागा तयार करणारा अभिनेता देवदत्त नागे सध्या डॉक्टर डॉन या मालिकेमधून आपली अभिनयाची नवी छाप उमटवतोयझी युवावरच्या या मालिकेमध्ये देवदत्त देवा सुर्वे नावाच्या एका इंटरनॅशनल डॉनची व्यक्तिरेखा साकारतोययात देवदत्त सोबत अभिनेत्री श्वेता शिंदे डिनच्या भुमिकेत पहायला मिळतेयसध्या या मालिकेमध्ये देवदत्त आणि श्वेता यांच्या प्रेमाचा ट्रॅक सुरु झालायज्यात देवा डॉ मोनिकाच्या प्रेमात पडू लागलाय मात्र ती अजूनही त्याच्याशी डिनच्या आविर्भावातच वागतेयआता प्रेमाचे हे रंग मालिकेमध्ये रंगताना त्यात रुसणं फुगणं आहेच पण त्यासोबत नाच गाणे हेही दिसणारे.

अशाच एका रोमॅन्टिक सीनचे शुट नुकतेच डॉक्टर डॉनच्या सेटवर पार पडलेयात मराठीमधला हा मॅचोमॅन चक्क गोविंदाच्या गाण्यावर थिरकलाय.  राजा बाबू या हिंदी सिनेमातल्या    या गोविंदाच्या हिट गाण्यावर देवदत्तला थिरकताना पहाणं ही त्याच्या चाहत्यांसाठी पर्वणीच ठरलीयेदेवदत्त साकारत असलेल्या देवा हा डॉन चक्क डॉ. मोनिका म्हणजेच श्वेताच्या प्रेमात पडलाय आणि आपल्या या प्रेमाची कबूली देण्यासाठी तो काहीही करायला तयार आहेयाचाच एक भाग म्हणजे देवाचा हा धमाकेदार डान्स.

खंडोबासारखी अत्यंत संवेदनशील आणि सखोल अशी भुमिका साकारल्यानंतर देवदत्तचा हा नवा अवतार चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरतोय.

No comments:

Post a Comment