Friendship day quotes from Shweta Shinde and Devdatta Nage
भार्गवी चिरमुले आणि तेजा देवकर, या माझ्या खूप जवळच्या मैत्रिणी आहेत. भार्गवी खूप उत्तमरित्या आणि चिकाटीने काम करते. तेजा खूप समाधानी आणि खुश आहे. कुणाच्याही बाबतीत ईर्षा, लोभ या गोष्टी दिसून येत नाहीत. या दोघींकडून हे गन घ्यायला मला नक्की आवडेल. दीपा आणि राजल या माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. या दोघींना फोन करून शुभेच्छा दिल्याशिवाय माझा फ्रेंडशिप डे पार पडत नाही. अर्थात, असा एक दिवस साजरा करणं, ही केवळ औपचारिकता असते. कारण, मी ज्या ज्या वेळी माझ्या जवळच्या मैत्रिणींना भेटते, तो प्रत्येक दिवस आमच्यासाठी खास दिवस असतो.
-श्वेता शिंदे (अभिनेत्री, डॉक्टर डॉन)
माझे अनेक जवळचे मित्र आहेत. आमचा एक उत्तम ग्रुप आहे. पारिजात, विजय, रमेश, राजू, अमित आणि मी असे आम्ही सगळे मित्र, अगदी भावांसारखे आहोत. मजामस्ती आणि सुखदुःख या साग्यात आम्ही एकत्र असतो. आता सगळेजण मोठे झालो आहोत. त्यामुळे आम्ही सगळे आणि आमची कुटुंबं, असे सगळेजण एकत्र धमाल करतो. अनुप नावाचा माझा एक बालमित्र सध्या परदेशात असतो. त्याच्याशी सुद्धा नुकतंच बोलणं झालं आहे. सगळ्याच जवळच्या मित्रांची नेहमीच आठवण येत असते. तंत्रज्ञान विकसित झालेलं असल्यामुळे, विडिओकॉल्स आणि फोनच्या माध्यमातून मित्रांशी संपर्क होतो, ही आनंदाची बाब आहे. कारण, आता सगळेच व्यस्त असल्यामुळे प्रत्यक्ष भेटणं शक्य होत नाही. कॉलेजमधला एक फ्रेंडशिप डे मला खूप लक्षात आहे. कांचन, म्हणजेच माझ्या पत्नीसोबत मी कॉलेजमध्ये असताना हा दिवस साजरा केला होता. अर्धांगिनी, ही सगळ्यात जवळची मैत्रीण असते, असं म्हणतात. त्याचा अनुभव मी तेव्हा घेतला.
मनोरंजन विश्वात रुचिता जाधव आणि इशा केसकर या माझ्या जवळच्या मैत्रिणी आहेत. माझ्या प्रत्येक नवीन कामाविषयी रुचितासोबत मी नेहमी बोलतो. इशा आणि माझी मैत्री घट्ट करणारा दुवा म्हणजे आमचं प्राणीप्रेम! तिला मांजरीची खूप आवड आहे. तिच्याकडे सध्या ५ ते ६ मांजरी आहेत. अनेक सण ती त्यांच्यासोबत साजरे करते. त्यामुळे, हा फ्रेंडशिप डे सुद्धा तिने त्यांच्याबरोबर नक्कीच साजरा केला असेल.
-देवदत्त नागे (अभिनेता, डॉक्टर डॉन)
No comments:
Post a Comment