करण बेंद्रे (प्रेम पॉयजन पंगा - झी युवा)
गणेशोत्सवाच्या खूप आठवणी माझ्याकडे आहेत. यापैकी एक ह्रदय आठवण म्हणजे लालबागच्या राजाचं दर्शन. मला नेहमीच लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं होतं. माझ्या मित्रांसोबत मी तसा प्लॅन ही केला पण त्यानंतर मला अचानक एक डबिंगचं काम आलं ज्यामुळे मला तिथे जावं लागणार होतं. मी माझ्या मित्रांना तसं कळवलं तर ते माझ्यावर थोडे नाराजही झाले मीही काहीसा खट्टू झालो होतो पण नंतर कळलं की माझं डबिंग लालबागलाच असणारे. मी जो खुश झालो जणू काही बाप्पानेच माझी आणि त्याची भेट घडवायचं नियोजन केलं होतं. त्यानंतर आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं आणि त्याचं तेज डोळ्यात भरुन तिथून समाधानाने परतलो.
शरयु सोनवणे (प्रेम पॉयजन पंगा - झी युवा)
आमच्याकडे घरात गणपती बसतो त्यामुळे गणपतीच्या आठवणी सांगायला गेले तर खूप आहेत. आमच्याकडे आधी सात दिवसांचा गणपती बसायचा पण आम्ही मुलांनी केलेल्या आग्रहाखातर मग आई बाबांनी अकरा दिवसांचा गणपती बसवायला सुरुवात केली. तुम्हाला गेल्यावर्षीची आठवण मला नक्कीच सांगायला आवडेल. आमच्याकडे शाडूच्या मातीची गणपतीची मुर्ती असते गेल्यावर्षी आम्ही त्या मुर्तीचं घरातचं विसर्जन केलं होतं आणि मग त्या मातीमध्ये आम्ही एक छानसं रोपटं लावलं. यावर्षीही आम्ही अशाच पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतोय. मी सर्वांनाच विनंती करेन की तुम्ही पण याच पद्धतीने गणपती बाप्पाचा हा सोहळा साजरा करा.
No comments:
Post a Comment