Thursday 27 August 2020

Zee Yuva - Lav Re Toh Video


लाव रे तो व्हिडीओ मध्ये बघा नाकाने बासरी वाजवणारा अवलिया...

बासरी आणि त्याच्या सुरांची जादू या जादूने देश तसेच परदेशाच्या संगीत क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेयओठांनी बासरीच्या सुरांची ही जादू तर तुम्ही नेहमीच अनुभवली असेलपण हे सूर आणि ​बासरीची जादू तुम्हाला नाकामधून ऐकायला मिळाली तरजळगावच्या पंडितराव जोहरे हे असेच एक अवलिया कलाकारजे ओठांनी नाही तर नाकपुड्याच्या साथीने ​बासरी वाजवतातपहायला आगळी वेगळी वाटणारी पंडितराव यांची किमया तेवढीच कष्टाची आणि जिकरीची आहेकैक वर्षाच्या तालमीतनं त्यांनी ही किमया आत्मसात केलीविशेष म्हणजे त्यांच्या या कलेतनं उमटणारे बासरीचे सूमधूर संगीत तेवढेच किंबहूना नेहमीपेक्षा जास्त मंत्रमुग्ध करणारे आहे.

झी युवावरच्या लाव रे तो व्हिडिओ या कार्यक्रमामधून पंडितरावांची ही सांगितिक जादू पहायला मिळेलचला हवा येऊ द्या फेम निलेश साबळे या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करतोयअवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करु शकेल आणि प्रेक्षकांना पोट धरुन हसायला लावेल अशा टॅलेंटचा शोध या कार्यक्रमातनं घेतला जाणारेमहत्वाचे म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणारेसमस्त महाराष्ट्रामधील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची संधी झी युवावरच्या या कार्यक्रमामुळे उमेदीच्या कलाकारांना मिळतेय शिवाय वयाची मर्यादा नसल्याने बच्चेकंपनीसह तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकही या कार्यक्रमात आपले व्हिडिओ शुट करुन पाठवू शकतात.

No comments:

Post a Comment