Monday, 7 September 2020

KSHANPATUR : MAKING

 मावळी भाषेतली शिवकालीन अंगाई 'क्षणपतूर' राजश्री मराठीवर

स्वराज्याचा मावळा घडविणाऱ्या कणखर आईचे रुप साकारणार प्राजक्ता माळी

राजमाता जिजाऊ आऊसाहेबांनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा यज्ञ मांडलाहा यज्ञ पूर्णत्वास नेण्यासाठी स्वराज्याच्या चरणी आपला जीव वाहणारे राजांचे साथीदार होतेच पण त्याच बरोबर होत्या पोलादाचं काळीज असलेल्या आणि जिजाऊंच्या पाऊलावर पाऊल ठेवून चालणाऱ्या स्वराज्यातील सर्व माता !

मी आणि माझं’ या भावनेने प्रत्येकालाच व्यापलं आहेआपलं स्वराज्य उभं राहील ते ममतेच्या त्यागावर आणि सावित्रीचं व्रत जपणाऱ्या स्त्रीत्वावरप्रत्येक आईला आपल्या मुलाने दीर्घायुषी व्हावं आणि आपल्या पतीलाही उदंड युष्य लाभावं असं वाटत असतं.  या अंगाई मध्ये स्वराज्याच्या लढाईसाठी मुलाला तयार करणाऱ्या आईचे कणखर रूप अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने साकारले आहेअसं म्हणतात की मुलाच्या आयुष्यात आईचं स्थान हे तलवारीच्या मागच्या मुठीसारखं असतंमुठ जितकी घट्टतितकी लढाई दमदारआपला पती आणि पोटचा पोरही आधी स्वराज्याचा हे ही भावना जपणाऱ्या आणि मायेपेक्षा कर्तव्य निभावणाऱ्या माऊलींना ही शिवकालीन अंगाई समर्पित आहे.

प्राजक्ता माळी हिने हळव्या आणि कणखर आईचे रूप साकारले आहे  रक भारतीया याने त्या स्वराज्याचा मावळा होण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेला लहान मुलगा साकारला आहेया शिवकालीन अंगाईचे गीत लेखन  दिग्दर्शन अनघा काकडे हिने केले आहेनुपूरा निफाडकरने ते संगीतबद्ध केले असून तिनेच त्याचे पार्श्वगायनही केले आहे

ही Do Re-Do प्रोडक्शन्सची निर्मिती हे  राजश्री मराठी च्या युट्यु चॅनेलवर  ही शिवकालीन अंगाई प्रसिद्ध झाली आहे.

Song  Link -   https://www.youtube.com/watch?v=SWIxMEw9n3k&feature=youtu.be

No comments:

Post a Comment