स्वरसम्राज्ञी आशा भोसलेजीं वाढदिवसानिमित्त झी टॉकीजतर्फे सांगितीक मैफीलीचं आयोजन..
चिरतरुण आवाज आणि तेवढाच सळसळता उत्साह याने रसिक प्रेक्षकांना कैक वर्ष भारावून टाकणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले येत्या 8 सप्टेंबरला 87 व्या वर्षात पदार्पण करतायत. आशाताई गेली तब्बल सहा दशकं भारतीय संगीत क्षेत्रामध्ये स्वतःचं वेगळं आणि अढळ स्थान राखून आहेत. त्यामुळे आशाताईंच्या या आगामी वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्यांच्या या योगदानाला साजेशा पद्धतीने करण्यासाठी महाराष्ट्राची लोकप्रिय वाहिनी झी टॉकीज पुढे सरसावलीये. झी टॉकीजने आशाताईंच्या या खास दिनाचं औचित्य साधत तब्बल तीन तासाच्या सांगितमय मैफिलीचे आयोजन केलेय.
भारतीय शास्त्रीय संगीत, रविंद्र संगीत, कव्वाली, लोकसंगीत याबरोबरच आशाताईंनी स्वरबद्ध केलेल्या गाजलेल्या चित्रपटगीतांचा आस्वाद या मैफीलीमधून प्रेक्षकांना घेता येईल. आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि मुग्धा वैश्यंपायन सारखे युवा गायक तर उर्मिला मातोंडकर, राधिका आपटे, भुमी पेडणेकर सारखे बॉलीवूडमधले नामांकीत चेहरे या मैफिलीमध्य़े परफॉर्म करणार आहेत.
येत्या रविवारी म्हणजे सहा सप्टेंबरला झी टॉकीजवर रात्री नऊ वाजता हा सांगितीक सोहळा पहायला मिळणारे. तेव्हा येत्या रविवारी झी टॉकीज लावायला विसरु नका.
Zee Talkies wishes the melodious queen Asha Bhosleji a Happy Birthday with a 3-hour tribute!
As the legendary singer Asha Bhosle celebrates her birthday this year, Zee Talkies steps in and kickstarts the celebrations this week. Arguably one of the most popular female singers of the industry and across generations, Ashaji has proved her versatility and with her glorious range. With six decades of melodious singing attached to her name, the talented young talent of today will pay her a tribute with a three-hour long show on Sunday, 6th September at 9pm. This musical mash-up will witness singing acts by Aarya Ambedkar, Kartiki Gaikwad, Mugdha Vaishampayan to name a few, along with dance performances by B-town divas like Urmila Matondhar, Bhumi Pednekar, Radhika Apte. The acts will surely be electrifying and leave the audience asking for more. Performing to the celebrated songs, the evening will be filled with songs from films, Indian classical tracks, qawwalis, folk songs, and even Rabindra sangeets. They will not only take you down memory lane but also revive the glorious days of the yesteryears.
Get set for a musical evening on Sunday, 6th September as Zee Talkies promises to bring in Ashaji’s birthday celebrations on a high note!
No comments:
Post a Comment