Thursday 17 September 2020

Zee Yuva - Almost Suphal Sampurna

 ऑलमोस्ट सुफळ संपूर्णमध्ये साजरा होणार अप्पांचा ७५वा वाढदिवस

झी युवा वाहिनीवरची ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरतेयहे त्या मालिकेच्या आणि यातल्या कलाकारांच्या वाढत्या चाहतावर्गामुळे कळतंयातल्या नचिकेत आणि सई या महत्वाच्या व्यक्तिरेखांसोबतच अप्पा केतकर ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी उचलून धरलीयेशिस्तप्रिय प्रामाणिक पण तेवढेच प्रेमळ असे अप्पा या मालिकेचा जणू प्राण बनलेतअशा या लाडक्या आणि आदरणीय अप्पांचा ७५ वा वाढदिवस तिथीनूसार येऊ घातलाय आणि त्याचं सेलिब्रेशन लवकरच तुम्हाला या मालिकेमध्ये पहायला मिळणारे.

अप्पांचा तिथीनूसार ७५ वा वाढदिवस येतोय म्हणून नचिकेत खास तयारीला जुंपलायत्याने अप्पांची आवडती ७५ पुस्तकं आणलीयेत आणि ती अनाथआश्रमाला भेट द्यायचे त्याने ठरवलेय शिवाय अप्पांना झाडांची आव़ड असल्याने त्याने ७५ वेगवेगळी रोपं आणून ठेवली आहेत यातलं एक कलम त्याने त्यांच्या घराच्या बाहेर लावलंय तर उरलेली ७४ रोपं सोसायटीच्या परिसरात लावण्याचा त्याचा प्लॅन आहेएकूणच अप्पांचा वाढदिवस त्यांच्या आवडीनूसार आणि कलेनूसार साजरा करण्याची पुर्ण योजना नचिकेतने बनवलीये.

पण अप्पांसाठी बनवलेली नचिकेतची कुठलीही योजना अडथळ्याशिवाय पुर्ण होईल इतकं सोप्पं थोडीच असणारे यातही ट्विस्ट येणारचते काय असेल ते मात्र तुम्हाला येणाऱ्या भागांमध्ये दिसेलचतेव्हा पहायला विसरु नका ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण रोज रात्री  वाजता फक्त झी युवा वाहिनीवर.

No comments:

Post a Comment