Monday 3 May 2021

&TV | एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मध्‍ये दबंग मलायकाच्‍या भूमिकेत नवीन चेहरा जसनीत कौर

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन' प्रेक्षकांना डोळ्यांतून अश्रू येईपर्यंत खदखदून हसवत आहे. या मालिकेमध्‍ये लवकरच नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे. मलायकाची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री जसनीत कौर कांत. मुंबईमध्‍ये जन्‍म व मोठी झालेल्‍या जसनीतने लहान पडद्यावर काही लहान भूमिका साकारल्‍या आहेत. मलायका ही दबंग वृत्ती असलेल्‍या टॉमबॉयसारखी आहे, तर जसनीतचे व्‍यक्तिमत्त्व अत्‍यंत मितभाषी आहे. या दोघींमधील साम्‍य म्‍हणजे जसनीत आणि तिची रील भूमिका मलायका या दोघींचाही त्‍यांचे जिवलग मित्रमैत्रिणी व कुटुंबांप्रती संरक्षणात्मक स्वभाव आहे, म्‍हणूनच मलायकाच्‍या भूमिकेसाठी जसनीत योग्‍य आहे. पलटनचा भाग होण्‍यास उत्‍सुक असलेली जसनीत म्‍हणाली, ''मला मलायकाची भूमिका आवडली आहे. ती वेगळी असली तरी माझ्यासारखीच आहे. मला खूप आनंद झाला आहे. माझ्यासाठी ही घडलेली सर्वोत्तम गोष्‍ट आहे. टीव्‍ही मालिका व रंगभूमीवर लहानशा भूमिका साकारल्‍यानंतर मी मालिकेमध्‍ये योग्‍य भूमिका मिळण्‍याबाबत खूपच सकारात्‍मक होते, ज्‍यासाठी मी अनेक ऑडिशन्‍स दिल्या. अखेर मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'साठी मला निवडण्‍यात आले. मी मालिका पाहत आली आहे आणि नेहमीच मालिका व त्‍यामधील पात्रांनी सराईतपणे सादर केलेल्‍या विनोदांचे कौतुक करत आली आहे. असे प्रतिभावान कलाकार अवतीभोवती असल्‍यामुळे मी स्‍वत:ला भाग्‍यवान समजते. मला दररोज नवनवीन गोष्‍टी शिकण्‍यास मिळत आहेत. मी भूमिका साकारण्‍यास सज्‍ज असताना यावेळी प्रेक्षकांना दबंग मलायकाचा नवीन अवतार पाहायला मिळेल. आता प्रेक्षक 'नवीन मलायका काय नवीन घेऊन येत आहे?' हे जाणून घेण्‍यास उत्‍सुक असतील.''

पहा 'हप्‍पू की उलटन पलटन' दर सोमवार ते शुक्रवार रात्री १० वाजता फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर

No comments:

Post a Comment