Saturday, 1 May 2021

&TV | Jo hasate hai aapko, kya hasata hai unhe?

 जे तुम्‍हाला हसवतात, त्‍यांना कोण हसवतात?

असे म्‍हणतात की हास्‍य हे सर्वोत्तम औषध आहे आणि प्रत्‍येकजण गालातल्‍या गालात हसण्‍याचा आनंद घेत काही क्षणांसाठी सर्व चिंता विसरून जातात. विनोदी मालिका विशेषत: अशा आव्‍हानात्‍मक काळामध्‍ये कुटुंबाला परिपूर्ण मनोरंजनाचा आनंद देतात. प्रेक्षकांच्‍या आवडीच्‍या देखील काही मालिका असतात, ज्‍या त्‍यांना हसवून-हसवून लोटपोट करत असतील. अनेक घरामधील सदस्‍यांना हसवून-हसवून लोटपोट करणारे लोकप्रिय कलाकार राजू श्रीवास्तव, आसिफ शेख, अनु अवस्‍थी, शुभांगी अत्रे, योगेश त्रिपाठी आणि रोहिताश्‍व गौड त्‍यांना हसवणा-या गोष्‍टींबाबत सांगत आहेत. दिग्‍गज कॉमेडीयन राजू श्रीवास्‍तव म्‍हणाले, ''आपणा सर्वांना माहितच आहे की, मी कानपूरचा आहे आणि माझे कुटुंब व मी एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका 'भाबीजी घर पर है' व 'हप्‍पू की उलटन पलटन' पाहण्‍याचा आनंद घेतो. दोन्‍ही मालिकांमध्‍ये आपुलकी आहे आणि कडक कानपुरियाशैली सर्वांना हसवत आहे. आम्‍ही अजूनपर्यंत एकही एपिसोड पाहायला चुकलो नाही. मला खासकरून हप्‍पू व त्‍याचे कुटुंब, त्‍यांच्‍यामधील सातत्‍यपूर्ण नोक-झोक आवडतात आणि ठराविक कानपुरिया संवाद - 'न्‍योछावर कर दो', 'अरे दादा', 'गुर्दे छील देंगे', गुईयाँ के खेत में', 'कंटाप', 'निंबु निचोड देंगे', 'भौकाल', 'चिरांड' हे मला खूपच आवडतात. सर्व कलाकारांची शैली अत्‍यंत अनोखी आहे. तुम्‍ही दोन्‍ही मालिकांच्‍या नवीन एपिसोड्सना पाहून हसून-हसून लोटपोट व्हाल. ''मालिका 'भाबीजी घर पर है'मधील आसिफ शेख ऊर्फ विभुती नारायण मिश्रा म्‍हणाले, ''मी मनोरंजन क्षेत्रामध्‍ये आल्‍यापासून माझा सर्वतोपरी लोकांना आनंदी करण्‍याचा उद्देश राहिला आहे. एक परफॉर्मर म्‍हणून मला वाटते, ही आमची सुपरशक्‍ती आहे की आम्‍ही टेलिव्हिजन व मोठ्या पडद्याच्‍या माध्‍यमातून प्रेक्षकांना अनेक भावनांचा अनुभव देऊ शकतो. माझ्यावर प्रभाव असलेले असे एक व्यक्‍ती म्‍हणजे मेहमूदजी. त्‍यांची विनोदीशैली मला नेहमीच अचंबित करते. मी अनेकदा माझ्या मित्रांसाठी त्‍यांच्‍या विनोदांचा वापर करायचो आणि त्‍यांच्‍याप्रमाणे बोलण्‍याचा प्रयत्‍न देखील करायचो. असे घडले की मालिका 'भाबीजी घर पर है'मध्‍ये मला त्‍यांच्या'नयी पडोसन'मधील भूमिकेप्रमाणेच भूमिका साकारण्‍याची संधी मिळाली. माझ्यासाठी तो मोठा सन्‍मान होता. ''मालिका 'और भई क्‍या चल रहा है?'मधील अनु अवस्‍थी ऊर्फ बिट्टू कपूर म्‍हणाले, ''कॉमेडीयन म्‍हणून माझी ओळख कानपूरमधील स्‍थानिक पातळीवरून सुरू झाली. मी कधीच कल्‍पना केली नव्‍हती की माझी ही ओळख मुंबई व दिल्‍ली सारख्‍या महानगरांमधील लोकांपर्यंत देखील पोहोचेल. मला हसवणारी गोष्‍ट म्‍हणजे उत्तम विनोद असलेली उत्तम पटकथा आणि माझ्यासाठी हीच गोष्‍ट 'और भई क्‍या चल रहा है?'मध्‍ये आहे. मी मालिकेची पटकथा वाचताच समजून गेलो की उत्तम विनोद व कन्‍टेन्‍ट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतील. मी अशा मालिकेचा भाग आहे, जी मला कॉमिक करण्‍यासोबत त्‍याचा आनंद घेण्‍याची देखील मुभा देते. ''मालिका 'भाबीजी घर पर है'मधील शुभांगी अत्रे ऊर्फ अंगूरी भाभी म्‍हणाल्‍या, ''मी मनोरंजन क्षेत्रामध्‍ये आले तेव्‍हा विचार केला नव्‍हता की मी कधी विनोदीशैलीमध्‍ये निपुण असेन. मालिका 'भाबीजी घर पर है'सह मला विनोदीशैली आत्‍मसात करण्‍याची संधी मिळाली. मी स्‍टॅण्‍ड-अप कॉमेडी पाहण्‍याचा आनंद घेते. मला त्‍यामधील उत्‍स्‍फूर्त सत्रे आवडतात आणि प्रेक्षकांसोबत मिळून-मिसळून जाते. मला रसेल पीटर्सला त्‍याची विनोदीशैली व सर्वोत्तम सादरीकरणासाठी पाहायला आवडते. ''मालिका 'हप्‍पू की उलटन पलटन'मधील योगेश त्रिपाठी ऊर्फ हप्‍पू सिंग म्‍हणाले, ''मी जेव्‍हापासून 'अरे दादा' संवाद म्‍हणायला लागलो, तेव्‍हाच समजून गेलो की हा संवाद मी जे कोणी आहे, त्‍याचा अंतर्गत भाग बनेल आणि प्रेक्षकांना ते

आवडेल. लहान मुले मला हप्‍पू दादा म्‍हणून हाक मारतात तेव्‍हा मला खूप आनंद होतो. लोकांना हसवणे ही एक कला आहे, जी मी सर्वात महान कॉमेडीयन – चार्ली चॅपलिन यांच्‍याकडून शिकलो आहे. या महान व्‍यक्‍तीने मूक कॉमेडीला नव्‍या उंचीवर नेले. त्‍यांना माहित होते की, फक्‍त हावभाव लोकांना अचंबित करण्‍यासाठी पुरेसे आहेत. त्‍यांची सादरीकरणे व वागण्‍याच्‍या पद्धतीमधून हजारो शब्‍द समोर आले, त्‍यांनी अगदी सहजपणे सर्वांना हसवले आणि जगाला एकत्र आणले. ''मालिका 'भाबीजी घर पर है'मधील रोहिताश्‍व गौड ऊर्फ मनमोहन तिवारी म्‍हणाले, ''कॉमेडी हे जगामध्‍ये शांततापूर्वक व सकारात्‍मक पद्धतीने बदल घडून आणू शकते. विशेषत: सद्यस्थितीमध्‍ये आपण सर्व जगाला आनंदमय स्‍थळ बनवण्‍याचा प्रयत्‍न करत असताना हे खूपच उपयुक्‍त ठरू शकते. मी सेटवर माझ्या संवादांचा सराव करत असताना स्‍वत:ला विचारल्‍याशिवाय राहू शकत नाही की 'हा संवाद प्रेक्षकांना हसवेल का?'. कारण मला माहित आहे की, हजारो लोक रोजच्‍या व्‍यस्‍त कामकाजामधून विरंगुळा म्‍हणून टेलिव्हिजन पाहतात. माझ्यासाठी दिग्‍गज जॉनी वॉकर आणि 'शिकार' व 'चाची ४२०' सारख्‍या चित्रपटांमधील त्‍यांच्‍या विनोदी भूमिका आवडत्‍या आहेत. तसेच ओम पुरी, परेश रावल, बोमन इराणी, जॉनी लिव्‍हर यांनी त्‍यांच्‍या विनोदी भूमिकांमधून मला हसवून-हसवून लोटपोट केले आहे. ते हसतात आणि हसवतात देखील!''

No comments:

Post a Comment