मुंबई ४ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीच्या घरात आज एक घोषणा झाली ज्यामुळे सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. आणि ती घोषणा म्हणजे “बिग बॉस आपणा सर्वांना आपले फोन्स परत देते आहेत”. बिग बॉस मराठीच्या घरात येताना सदस्यांना बर्याच गोष्टींना बाहेरच सोडून यावे लागते, त्यातली एक गोष्ट म्हणजे फोन्स. आणि आज बिग बॉस तेच सदस्यांना परत करणार असे सांगणार आहेत. स्पर्धकांना त्यांचे फोन्स परत मिळणार ? पुढे काय काय गोंधळ उडणार ? हे तर आजच्या भागामध्ये कळेलच. नुकत्याच बाहेर आलेल्या प्रोमोमध्ये घरामध्ये एक फोन दिसत आहे. म्हणजेच आज घरामध्ये एक फोन पाठवण्यात येणार आहे. त्या फोनची रिंग वाजली आणि घरामध्ये एकच आवाज घुमला “फोन आला, फोन आला”. आणि त्यातून बिग बॉस यांचा आवाज आला. ज्यामध्ये त्यांनी घोषित केले सदस्यांना त्यांचे फोन्स परत देणार. फोन जयने घेतला होता, आणि जयने हे सांगताच सदस्यांचा काही विश्वास त्यावर बसेना. बघूया काय होतं पुढे.
सुरेखाताई, गायत्री, मीनल, मीरा आणि दादुस या सदस्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगताना दिसणार आहे. ज्यामध्ये सुरेखाताई दादुस यांना सांगताना दिसणार आहे, “आम्ही शूटिंगमध्ये जेव्हा कानाखाली लावतोना तेव्हा कसं असंत माहिती” ? आणि मग त्यांची मज्जा मस्ती सुरू झाली. पण हे करू दाखवताना दादुस यांना खरोखरच चुकून फटका बसणार आहे.पुढे अजून घरामध्ये काय होत हे जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा कलर्स मराठीवर.
तेव्हा बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment