Monday 18 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस एकविसावा “माझा बाकीच्यांवर अजिबात विश्वास नाहीये” – स्नेहा वाघ “नकोच ठेऊ कोणावर विश्वास” – जय

 

मुंबई १८ ऑक्टोबर, २०२१ :  बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कधी कधी कोणावर विश्वास ठेवावा हे सदस्यांना कळतं नाही. कोण आपल्या बाजूने खरंच आहे आणि कोण असल्याचा आव आणत आहे हे हळूहळू काही काळ गेल्यानंतर कळून चुकत. स्नेहा बर्‍याचदा जयला सांगताना दिसते की, तिचा फक्त जयवरच विश्वास आहे बाकी कोणावर नाही. मग उत्कर्ष असो, वा बाकीचे त्यांच्या गटातील स्पर्धक असो. याचबद्दल जय आणि स्नेहा बोलताना दिसणार आहेत. नक्की ते कशाबद्दल बोलत आहेत ? कोणाबद्दल चालू आहे विषय ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. 

स्नेहा जयशी आज चर्चा करताना दिसणार आहे. स्नेहाचे म्हणणे आहे, “तुमच्या चौघांमध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही. तू त्यांच्याशी loyal रहा. तुम्ही तुमचे रहा. तुम्ही ते करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मी तुला हे सांगते जसं मी आधी देखील सांगितले मला तुझ्यावर विश्वास आहे, पण मी बाकीच्यांवर विश्वास नाही ठेऊ शकतं.” जय म्हणाला, “काल जी गोष्ट झाली ना... Loyalty ची गोष्ट वेगळी आहे. मी आता उत्कर्षला देखील सांगितल. नको ठेऊस विश्वास बाकीच्यांवर.”

आता हे दोघे नक्की कशाबद्दल बोलत आहेत ? काय घडलं आहे ? ही आजच्या भागामध्ये कळेलच. तेव्हा बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment