Friday 15 October 2021

बिग बॉस मराठी सिझन तिसरा – दिवस विसावा ! “तुमच्या सगळ्यांची indirectly लायकी काढली” – आदिश वैद्य

मुंबई १५ ऑक्टोबर, २०२१ : बिग बॉस मराठीमध्ये सुरू असलेल्या “करूया आता कल्ला” या टास्कमध्ये काल सुरेखा ताईंनी आदिशला सुनावले तू आता आला आहेस BB मध्ये आम्ही जुने आहोत. त्यावरून आदिशल सुरेखा कुडची यांचा प्रचंड राग आला. आणि त्यावरूनच तो आज विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर त्याचं मत मत मांडताना दिसणार आहे. आता यावरून घरामध्ये अजून कोणता राडा होणार हे आजच्या भागामध्ये कळेलच.

आदिश सुरेखा ताईंनवर आज खूप भडकेला दिसणार आहे आणि त्याच्या मनातल्या गोष्टी तो विशाल, विकास, आविष्कार आणि सोनालीसमोर सांगणार आहे.आदिश म्हणाला, “आता टास्कमध्ये जास्त मला बोलायचं नाहीये, आता टास्क पहिले होऊन जाऊदे. स्वत:ला जायचं होतं कालपर्यंत बाहेर.. रडारड केली चार दिवस. माझं काय, मला खेळायचं नाही म्हणून. Thank you नोट देताय का आतापासून... जाना मग. मी तुम्हांला स्पष्ट सांगतो वाईट नका मानून घेऊ, तुमची लायकी काढली आहे सगळ्यांची. तुमची indirectly लायकी काढली. त्यावर सोनाली म्हणली “ती काय लायकी काढणार आमची. विशाल तुला रागाबद्दल बोले तुलाच का रागाबद्दल बोले दुसरं कोणी रागावल नाही का यांच्या टीममधलं ? हे जे फालतू थिल्लरपणा करतात ते बरोबर आहे का ? तुझा राग दिसतो ? स्नेहासोबत बरोबर गोडगोड बोलतात...  मग ” सोनाली म्हणाली, “टॉप ५ मध्ये कोण आहे हे आता ही ठरवणार ? आणि कालपर्यंत रडत होती. माझं काही चालणार नाही, हे होणार नाही ते होणार नाही. हा रूल तुम्ही सगळ्यांना दिला का टॉप ५ कोण आहे हे सांगता?”

नक्की काय झालं ते बघूया आजच्या भागामध्ये. तेव्हा बघा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment