Friday 23 September 2022

25 सप्टेंबर रोजी ‘झी टीव्ही’वर पाहा ‘आरआरआर’चा टेलिव्हिजन प्रीमिअर!

अतुलनीय चित्रपटीय अनुभवाचा उदय (राइज), जगभरातील बॉक्स ऑफिसवर केलेली गर्जना (रोअर) आणि प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहात खेचून आणण्यासाठी केलेल्या बंडाचा (रिव्होल्ट) संगम असलेला हा ‘आरआरआर’ चित्रपट आहे. यंदाच्या मूव्ही ऑफ द इयरच्या चित्रपटाचा टीव्ही प्रीमिअर 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता ‘झी सिनेमा’ वाहिनीवरून प्रसारित होणार असून प्रेक्षकांना आपल्या घरीच निवांतपणे हा चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे.

एस. एस. राजमौली यांनी अत्यंत भव्य स्तरावर बनविलेल्या या चित्रपटाने आजवर तब्बल एक हजार कोटी रुपयांचा गल्ला जमविला असून त्यात दक्षिणेकडील राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर या दोन अत्यंत लोकप्रिय आणि जबरदस्त ताकदीच्या सुपरस्टारची जोडी तर आहेच, पण बॉलीवूडचा सुपरस्टार अजय देवगण आणि आलिया भट यांचीही कामगिरी पाहायला मिळते. या मल्टीस्टारर चित्रपटाने जगभरातील मनोरंजनाच्या उद्येगाला गदागदा हलविले आहे.

अनेक महत्त्वाच्या सुपरस्टारच्या भूमिका असलेला ‘आरआरआर’चा भारतात बनविलेल्या सर्वाधिक खर्चिक चित्रपटांमध्ये समावेश होतो. त्याच्या निर्मितीसाठी 550 कोटी रुपये खर्च आला आहे. त्यातील अगदी वास्तववादी वाटणारे आणि डोळे फिरविणारे स्पेशल इफेक्टसची केवळ भारतातील तंत्रज्ञांनी प्रशंसा केली नसून जागतिक चित्रपट उद्योगानेही त्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.

स्वातंत्र्यपूर्व काळातील मूल्यांचे दर्शन घडवणार्‍्या ‘आरआरआर’ या चित्रपटात प्रेक्षकांना मैत्री, अविश्वसनीय अमाप ऊर्जा, तोंड आ वासून उघडे पाडणारे थरारक अॅक्शन प्रसंग, निरागस प्रेम आणि उत्कंठावर्धक नाट्य ठासून भरले आहे. तो पाहताना तुम्ही आपल्या आवडत्या कलाकाराची बसल्या जागी प्रशंसा करू शकाल. तेव्हा 25 सप्टेंबर रोजी सकाळी 12.00 वाजता ‘झी टीव्ही’ वाहिनीवर ‘आरआरआर’चा टीव्ही प्रीमिअर पाहताना एका भव्य कलाकृतीची अनुभूती घेता येईल.

25 सप्टेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता पाहा ब्लॉकबस्टर ‘आरआरआर’चा प्रीमिअर फक्त ‘झी टीव्ही’ वाहिनीवर!

No comments:

Post a Comment