Thursday, 6 October 2022

'ऐ जिंदगी'चा ट्रेलर रिलीज! Aye Zindagi Poster and Trailer

 अविश्वसनीय सत्यकथेवर आधारलेल्या रेवती, सत्यजीत दुबे आणि मृण्मयी गोडबोले अभिनीत 'ऐ जिंदगी'चा ट्रेलर रिलीज!

अनिर्बन बोस दिग्दर्शित 'ऐ जिंदगी'चा मेडीकल ड्रामा १४ ऑक्टोबर रोजी जागतिक पातळीवर रिलीज होणार!!

उदयोन्मुख आणि उत्साहवर्धक प्रतिभेच्या पाठिशी उभे राहणारं प्लॅटून वन फिल्म्स प्रॉडक्शन हाऊस हे प्रादेशिक चित्रपट निर्मितीसाठी एक बुटीक फिल्म स्टुडिओ आहे. प्लॅटून वन फिल्म्स’ प्रॉडक्शन हाऊस, भारत आणि उत्तर अमेरिकेतील थिएटरमध्ये 'ऐ जिंदगीया हृदयस्पर्शी नव्या चित्रपटासह परतलं असून त्यांच्या निर्मिती संस्थेची ही पहिलीच सोलो निर्मिती आहे.

'ऐ जिंदगी या चित्रपटाचं पोस्टर आणि ट्रेलर सोशल मीडियावर सध्या कमालीच ट्रेंडिंग होत आहेत. एक भावनिक रोलरकोस्टर असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवून ठेवेल. एका अविश्वसनीय सत्यकथेवर आधारित असलेला 'ऐ जिंदगी हा चित्रपट एका २६ वर्षीय यकृत सिरोसिस रुग्ण विनय चावलाचा प्रवास सादर करणारा आहे. विनयची रुग्णालयातील सल्लागार रेवती यांच्याशी संभव नसलेला बंधत्याच्या जीवनावरील आशा आणि विश्वास पुन्हा जागृत करतो आणि त्याला मानवतेच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवायला लावतो.

'ऐ जिंदगीहा चित्रपट विविध कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. त्यापैकी मुख्य कारण म्हणजे दक्षिणेकडील ज्येष्ठ अभिनेत्री आणि तीन वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारावर आपले नाव कोरणाऱ्या रेवती यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत मुख्य भूमिकेतील पुनरागमन हे आहे. या चित्रपटात मुंबई डायरीजमधील ब्रेकआउट स्टार सत्यजीत दुबेज्येष्ठ गुजराती अभिनेते हेमंत खेरश्रीकांत वर्मा सावन टँक मुस्कान अग्रवाल आणि प्रांजल त्रिवेदी या कलाकारांसोबत ‘चि. व चि. सौ. कां.’ फेम आपली मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी गोडबोले 'ऐ जिंदगी' द्वारे नव्या क्षितिजाकडे वाटचाल करीत आहे.

मृण्मयी गोडबोले म्हणाली कीऐ जिंदगी ही आशा, प्रेम आणि उभारीची कथा आहे. यात खूप आपलेपणाचे  वातावरण असल्याने प्रेक्षक प्रत्येक कॅरेक्टरशी स्वत:ला रिलेट करतील. या चित्रपटात मी एका मल्याळम नर्सची भूमिका साकारली आहेजी माझ्यासाठी नवीन आणि आव्हानात्मक होती. या चित्रपटाच्या कास्ट–क्रू सोबत काम करणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. ऐ जिंदगी हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबर रोजी संपूर्ण भारत आणि उत्तर अमेरिकेतील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असल्याने ती माझ्यासाठी विशेष आनंदाची बाब म्हणता येईल.

'बॉम्बे रेन्स', 'बॉम्बे गर्ल्स', 'माईस इन मेनआणि 'द डेथ ऑफ मिताली दत्तोया कादंबऱ्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या डॉ.अनिर्बन बोस यांनी या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. डॉक्टर बनण्यापासून ते लेखक-दिग्दर्शका पर्यंतच्या या उल्लेखनीय प्रवासावर अनिर्बन सांगतात की'ऐ जिंदगीआणि मी सामान्यपणे करत असलेल्या गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. मी एक डॉक्टर असल्यानं रूग्णांची काळजी घेतो तसंच मेडिकलच्या विद्यार्थ्यांना शिकवतो. मला माझ्या कम्फर्ट झोनबाहेर काढूनआयुष्यातील दोन वर्षे या चित्रपट निर्मितीकरता समर्पित करण्यास प्रवृत्त करणाऱ्या या कथेतील सौंदर्य प्रेक्षकांना प्रेमात पाडल्याशिवाय राहणार नाही. ते पुढे म्हणाले कीही कथा खूप सुंदर आणि नाट्यमय वळणांनी भरलेली आहे. सर्व कलाकारांनी ज्वलंत अभिनय केला असूनप्लॅटून वन फिल्म्स’ माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे.

पिकासो आणि युअर्स ट्रुली’ सारख्या प्रशंसनीय चित्रपटांची निर्मिती केल्यानंतरप्लॅटून वन फिल्म्सचे संस्थापक शिलादित्य बोरा लवकरच थिएटरमध्ये दाखल होणार्‍या त्यांच्या पहिल्या होम प्रॉडक्शनबद्दल उत्साहित आहेत. ते म्हणाले की मी अनिर्बनला जवळजवळ १५ वर्षांपासून ओळखतोजेव्हा मी पहिल्यांदा त्यांची बॉम्बे रेन्सबॉम्बे गर्ल्स ही अद्भुत कादंबरी विध्यार्थी दशेत असताना वाचली होती, तेव्हाच मी त्यांचे अभिनंदन केले होते. मागील बऱ्याच वर्षांच्या सहकार्यातून आमची मैत्री अधिकाधिक घट्ट झाली आहे. या प्रतिभासंपन्न सर्जकाची कलाकृती रसिकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण करण्यात यशस्वी होईल ही खात्री आहे. मला अजूनही आठवतं जेव्हा डॉ. अनिर्बननं मला आणि माझ्या पत्नीला रात्रीच्या जेवणाच्या वेळी त्यांच्या एका पेशंटची अविश्वसनीय सत्यकथा सांगितली. ती ऐकून आम्ही सर्व रडलो होतो. तुमच्या आयुष्यात एकदा तुम्ही एक कथा ऐकावी आणि तुम्ही स्वतःबद्दल विचार करावाही या चित्रपटाच्या कथेची ताकद असूनहा अनुभव जगलेली व्यक्तीच ही कथा पडद्यावर पेश करीत असल्याने ती अधिक हृदयस्पर्शी झाली आहे. आम्ही हा चित्रपट वैद्यकीय क्षेत्राचा सन्मान वाढविणाऱ्या प्रभूतींना समर्पित करीत असून कोविड पश्चात प्रदर्शित होत असल्याने त्याचे महत्व वाढले आहे.

प्लॅटून वनबाबत - प्लॅटून वन फिल्म्स ही संस्था चित्रपट व्यवसायात कार्यरत आहे. आम्ही दर्जेदार निर्मितीसोबतच कलात्मकमूल्य, विपणनवितरण आणि सिंडिकेशनवर मुख्यत्वे लक्ष केंद्रित केले असून मोशन पिक्चर व्यवसायासाठी बुटीक फिल्म स्टुडिओ’ निर्मिती केली आहे, याद्वारे चित्रपट व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्याचे विशेष काम केले जात आहेभारतीय चित्रपट उद्योगाला अधिक अर्थपूर्ण आणि फायदेशीर मार्गाने जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करणे हे आमच्या संस्थेचे मुख्य ध्येय असून, आमच्या सध्याच्या चित्रपटांमध्ये सबा आझादगीतांजली कुलकर्णी आणि नमित दास अभिनीत 'मिनिमम', विनय पाठक,  मासुमी मखिजा आणि मनु ऋषी चढ्ढा यांच्या मुख्य भूमिका असलेला 'भगवान भरोसे आणि ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'तो ती आणि फुजी यांचा समावेश आहे.

Youtube Link: https://www.youtube.com/watch?v=892DxAMnqIY

https://drive.google.com/file/d/1JSorRnhk-cGOMf2dtc72MSbOmNomZ7Vn/view?usp=drive_web

No comments:

Post a Comment