मराठी वऱ्हाडाला गुदगुल्या करण्यासाठी मकरंद अनासपुरे, विजय पाटकर, पॅडी कांबळे आणि कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर घेऊन येतायेत धम्माल विनोदी 'वऱ्हाडी वाजंत्री'!
मोशन पोस्टरद्वारे सोशल मीडियावर जोरदार एंट्री!
‘स्वराज फिल्म प्रॉडक्शन’च्या लग्नाचं ‘वऱ्हाड’ ११ नोव्हेंबरला सिनेमाघरात!
दिवाळी संपताच वेध लागतात ते लग्न सराईचे. यंदाची लग्नसराई आपल्या सर्वांसाठी विशेष असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वांचा लाडका अभिनेता मकरंद अनासपुरे आणि मिश्कील विनोदाचा शहनशहा विजय पाटकर वाजंत्र्यांसोबत सगळ्या वऱ्हाडाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. यजमान कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांनी या सोहळ्याचा घाट घातला असून फुल्ल मनोरंजनाची ट्रीट देण्यासाठी ते स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित मल्टीस्टारर “वऱ्हाडी वाजंत्री”हा चित्रपट घेऊन या लग्न सराईत अवतरणार आहेत. भरगच्च मनोरंजन असलेल्या या चित्रपटाची अधिकृत घोषणा मोशन पोस्टरद्वारे सोशल मिडीयावर करण्यात आली आहे.
कॅप्टन कल्पेश रविंद्र मगर यांच्या स्वराज फिल्म प्रॉडक्शन निर्मित आणि लोकप्रिय अभिनेते दिग्दर्शक विजय पाटकर दिग्दर्शित मल्टीस्टारर मराठी कौटुंबिक विनोदी 'वऱ्हाडी वाजंत्री' चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मुहूर्त पक्का झाला आहे. लवकरच लगीनसराई सुरु होत असल्याने दस्तुरखुद्द विजय पाटकर आपल्या सवंगड्यांसोबत रसिकांसाठी विनोदाचा हा बंपर आहेर घेऊन चित्रपट मंडपाच्या उंबऱ्यावर उभे आहेत. त्यांच्यासोबत प्रेक्षकांच्या स्वागतासाठी विनोदाचा हुकमी एक्का मकरंद अनासपुरे यजमान म्हणून मिरवणार असून पॅडी कांबळे आणि हेमांगी कवी या छुईमुई जोडीला बोहल्यावर चढवण्यासाठी तो उतावीळ झाला आहे.
लग्न ही जगात प्रत्येकासाठी विलक्षण गोष्ट असते. लग्नाळू व त्याच्या नातेवाईकांसाठी हा अनुभव अविस्मरणीय असतो. आजच्या हायटेक जमान्यात पारंपरिक लग्नसोहळ्याची जागा 'मॅरेज इव्हेंट्स'नी घेतली आणि त्यासोबत 'शादीराम घरजोडे' जाऊन 'सुटाबुटातला मॅरेजगुरु' डॉट कॉमसोबत जागोजागी कांदेपोह्यांसोबत गट्टी जमवत नवदांपत्यांचे प्री-वेंडिंग करत मेहेंदी - संगीत पार्ट्यांमध्ये तल्लीन होऊन धम्माल कम्माल करीत आहेत. काहीशी अशीच थीम घेऊन आपल्या एका सुसज्ज मॅरेजमेंट कंपनीद्वारे जगनकुमार अर्थात आपला लाडका मक्या...पंचक्रोशीतला मॅरेजगुरू झालाय...! आजमितीस या बिलंदर अवलियाने आपल्या भन्नाट अक्कलहुशारीतून ९९ची खेळी पार केलीय ... सचिनसारखी सेंचुरी लीलया करण्यासाठी तो कमालीचा उतावळा झालाय.... या रेकॉर्डब्रेक कामगिरीसाठी तो चक्क दादासाहेबांची बहीण परी आणि ताईसाहेबांचा भाऊ युवराजला बोहल्यावर चढविण्याचा चंग बांधून वरातीमागून घोडे दौडवण्यास सज्ज झालाय.... असं साधारण कथा बीज घेऊन वऱ्हाडी वाजंत्री या चित्रपटाचा संगीतमय विनोदी प्रवास सुरु होतो.
वैभव अर्जुन परब लिखित “वऱ्हाडी वाजंत्री” या चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेल्या मकरंद अनासपुरेंसोबत जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, रीमा लागू, पंढरीनाथ कांबळी, हेमांगी कवी, विजय कदम, प्रिया बेर्डे, जयवंत वाडकर, आनंदा कारेकर, सुनील गोडबोले, पूर्णिमा अहिरे, गणेश रेवडेकर, प्रभाकर मोरे, राजेश चिटणीस, प्रशांत तपस्वी, विनीत बोंडे, शिवाजी रेडकर, आशुतोष वाडेकर, शीतल कलाहपुरे, साक्षी परांजपे इत्यादी कलाकार आहेत. या चित्रपटाच्या संगीताची लीलया समर्थपणे संगीतकार अविनाश विश्वजित, शशांक पोवार यांनी पेलेली असून गीतकार राजेश बामगुडे यांच्या गीतांवर स्वरसाज गायक आदर्श शिंदे, आनंदी जोशी, मैथिली पानसे-जोशी, स्व. नंदू भेंडे, गणेश चंदनशिवे यांनी चढवला आहे. तर त्यावर नृत्य दिग्दर्शक उमेश जाधव, राजेश बिडवे यांनी केले आहे.
या चित्रपटाचे कथा, पटकथा, संवाद लेखन वैभव अर्जुन परब यांनी लिहिले आहेत तर छायाचित्रण शैलेश अवस्थी यांचे असून संकलक स्व. सलोनी कुलकर्णी, हेमंत गायकवाड आहेत. कला दिग्दर्शक गिरीश कोळपकर असून वेशभूषा गीता गोडबोले, पोर्णिमा ओक यांनी केली आहे तर कार्यकारी निर्माता इंदुराव कोडले पाटील आहेत. सह दिग्दर्शक मनोज सहदेव माळकर असून विज्युअल प्रमोशन संकलक दिनेश मेंगडे आहेत. साऊंड डिजाईनर शेखर भगत तर पार्श्वसंगीत रवींद्र खरात यांचे आहे. रंगभूषा अजित पवार तर जाहिरात संकल्पना मिलिंद मटकर यांची आहे. प्रसिद्धी जनसंपर्क प्रमुख राम कोंडू कोंडीलकर असून सोशल मीडिया मार्केटिंग तुषार रोठे पाहत आहेत. ध्वनीमुद्रण सुरेश कचवे यांनी तर पुनॆ: ध्वनिमुद्रक केविन गाला आहेत. स्थिरचित्रण राम वासनिक यांनी तर जाहिरात स्थिरचित्रण प्रथमेश रांगोळे यांनी केले आहे. पोस्ट प्रोडक्शन स्टुडीओ डीजीटोन येथे करण्यात आले असून चित्रपट वितरक – जयेश मिस्त्री यांची युजेएम नेटवर्क्स एन एन्टरटेनमेंट एलएलपी संस्था करीत आहे.
Instagram - https://www.instagram.com/
Facebook - https://www.facebook.com/
YouTube - https://www.youtube.com/
No comments:
Post a Comment