Friday 2 June 2023

उषाकडून ऊषा एनआयएफटी ‘बेस्‍ट गारमेंट कन्‍स्‍ट्रक्‍शन अवॉर्ड २०२३’च्‍या विजेत्‍याचा सन्‍मान

 


हेमा बोचा, ऊषा निफ्ट (नवी मुंबई) बेस्ट गारमेंट कन्स्ट्रक्शन अवॉर्ड २०२३ च्या विजेत्या, उषाच्या प्रादेशिक प्रतिनिधी - शिवण यंत्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
 

मुंबई, 31 मे २०२३: ऊषा इंटरनॅशनल या भारतातील आघाडीच्‍या शिलाई मशिन कंपनीने देशातील अग्रगण्‍य फॅशन संस्‍था एनआयएफटी (नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्‍नॉलॉजीसोबत सहयोग करत संस्‍थेमधील उत्तीर्ण झालेल्‍या उदयोन्‍मुख फॅशन डिझाइनर्सच्‍या सर्जनशीलतेला पुरस्‍कारित केले आहेयंदा उषा एनआयएफटी ‘बेस्‍ट गारमेंट कन्‍स्‍ट्रक्‍शन अवॉर्ड २०२३’ पुरस्‍कार देण्‍यात येणाऱ्या केंद्रांमध्‍ये बेंगळुरूभुवनेश्वरभोपाळचेन्नईगांधीनगरहैदराबादजोधपूरकांगडाकन्नूरकोलकातामुंबईनवी दिल्लीपंचकुलापटनारायबरेली आणि शिलाँग यांचा समावेश आहे.

मुंबईत हेमा बोचा ने ऊषा एनआयएफटी बेस्‍ट गारमेंट कन्‍स्‍ट्रक्‍शन अवॉर्ड २०२३ जिंकला. उषा वर्ष २००० पासून दरवर्षी या प्रतिष्ठित पुरस्‍काराला प्रायोजित करत आहेविजेत्‍याला पुरस्‍काराचा भाग म्‍हणून ऊषा जॅनोम अॅल्‍युअर डीएलएक्‍स ऑटोमॅटिक शिलाई मशिन, ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि १०,००० रूपयांचे रोख बक्षीस मिळाले. या पुरस्‍कार 
सोहळ्यामध्‍ये एनआयएफटी फॅकल्‍टी  एनआयएफटीच्‍या विद्यार्थ्‍यांसह त्‍यांचे पालक उपस्थित होते

या सहयोगाबाबत आपले मत व्‍यक्‍त करत उषाचे प्रवक्‍ते म्‍हणाले, ‘‘एनआयएफटीसोबतच्‍या या सहयोगामधून फॅशन उद्योगातील टॅलेंटला निपुण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते आणि या तरूण विद्यार्थ्‍यांच्‍या अपवादात्‍मक सर्जनशीलता  कौशल्‍याला प्रशंसित करतो.’’ 

हेमा बोचा ने जिंकलेली उषा जॅनोम अॅल्‍युअर डीएलएक्‍स या नवोन्‍मेष्‍कारीअत्‍याधुनिक शिलाई मशिनमध्‍ये ऑटोमॅटिक नीडल थ्रेडिंगसह एलईडी शिलाई लाइटभरतकामासाठी फीड ड्रॉप लेव्‍हर१३ बिल्‍ट-इन स्टिच फंक्‍शन्‍स आणि २१ अॅप्‍लीकेशन्‍सतसेच बटनहोल स्टिचरोल केलेले हेमिंगस्‍ट्रेच स्टिचिंगएम्‍ब्रॉयडरीझिप फिक्सिंगक्विल्टिंगस्‍मोकिंग इत्‍यादी सुविधा आहेतशक्तिशाली बेस इतर मशिन्‍सच्‍या तुलनेत  पट प्रबळ स्टिचेस् देतोउषा जॅनोम अॅल्‍युअर डीएलएक्‍स शिलाई मशिनमध्‍ये वक्राकार स्टिचिंगसाठी फ्री आर्म आणि पॅटर्न  स्टिच लांबी निवडण्‍यासाठी दोन डायल्‍स देखील आहेत. 

अधिक माहितीसाठी कृपया भेट द्याwww.ushasew.com

No comments:

Post a Comment