Tuesday 6 June 2023

महाराष्ट्रभर आनंदाचा गंध पसरवायला येत आहे "कस्तुरी" अशोक फळदेसाई साकारणार समर कुबेरची भूमिका ! "हे माझ्यासाठी घरी परत आल्यासारखंच आहे" - अशोक फळदेसाई

मुंबई ६ जून, २०२३ : असं म्हणतात आईनंतर निःस्वार्थी प्रेम करणारे कोणी असेल तर ती फक्त बहीणच असते. हे अनोखं नातं म्हणजे बहिण - भावाचं... याच धाग्यावर आधारित "कस्तुरी" हि नवी कोरी मालिका कलर्स मराठी घेऊन येत आहे. मालिकेमध्ये कस्तुरी आणि नीलेशचं नातं देखील असंच आहे अगदी घट्ट. अत्यंत दिलदार स्वभावाची, दुसऱ्यांना मदत करायला सदैव तत्पर असणारी कस्तुरी. जिचा ‘करुणा’ हा स्थाई भाव आहे. निलेश कस्तुरीचा धाकटा भाऊ. अत्यंत हुशार पण संतापी आहे. निलेश समर कुबेर याच्या पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करत आहे. समर अत्यंत महत्वाकांक्षी. काहीसा स्वार्थी, पण काहीतरी चांगलं करून धाकवण्याची ईच्छा असलेला कुबेर घराण्याचा मुलगा आहे. पण निलेशला कस्तुरीचा विरोध आहे. एकता लबडे कस्तुरीची भूमिका साकारणार असून निलेशची भूमिका दुष्यंत वाघ. तर समर कुबेरची भूमिका अशोक फळदेसाई साकारणार आहे. कलर्स मराठीवरील जीव झाला येडापिसा या मालिकेतून लोकप्रिय झालेला रांगडा शिवा दादा पुन्हाएकदा येत आहे आपल्या भेटीला कस्तुरी या मालिकेतून. महाराष्ट्रभर आनंदाचा गंध पसरवायला येत आहे "कस्तुरी" २६ जूनपासून सोम ते शनि रात्री १०.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अशोक म्हणाला, "कलर्स मराठीवर पुन्हा एकदा काम करणं म्हणजे माझ्यासाठी घरी परत आल्यासारखंच आहे...मी गेल्या तीन- चार वर्षांत ज्या भूमिका केल्या त्या ग्रामीण बाजाच्या होत्या... यावेळी पहिल्यांदा मी पूर्णपणे वेगळ्या ढंगाची, वेगळ्या बाजाची भूमिका करतोय. वेगळ्या प्रकारची भूमिका तीही कलर्स मराठी सारख्या platform वर याचा मला खूप आनंद आहे. आताची भूमिका ही आधीच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळी आणि आव्हानात्मक आहे. आणि या पात्रासाठी  मी खूप तयारी केलीये, करतोय. मला अशी वेगळ्या प्रकारची भूमिका करतांना आनंद मिळतोच आहे पण तुम्हाला सर्वांना पण ही भूमिका बघायला खूप आवडेल याची मला खात्री आहे. या आधी तुम्ही जीव झाला येडा पिसा मालिकेमधल्या शिवा या पात्रावर भरभरून प्रेम केलंत तसं कस्तुरी या मालिकेवर आणि या मधल्या समर कुबेर या पात्रावर असेच प्रेम करावे ही इच्छा आहे. “श्री अधिकारी ब्रदर्स “ या नावाजलेल्या प्रोडक्शन हाऊसशी मी जोडला गेलोय याचा मला खूप आनंद आहे. समर कुबेर या पात्राबद्दल सांगायचं  झालं तर तो खूप स्मार्ट आहे, शिकलेला आहे, श्रीमंत घरातला आहे. त्याचा त्याच्या घरच्यांवर खूप जीव आहे, सर्वांना मान देणारा आहे. Family business मध्ये आहे पण त्याला राजकारणात प्रचंड रस आहे. तो एक निस्वार्थी राजकारणी आहे. लोकांची सेवा करणारा, अडल्या नडल्याना मदत करणारा आहे. विचार करून निर्णय घेणारा असा हा समर कुबेर आहे. येतोय मी दुप्पट ऊर्जा घेऊन पुन्हा एकदा तुमच्या भेटीला."

समरच्या आयुष्यात येण्याने अशी कुठली घटना घडणार ज्यामुळे तिघांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळणार ? समरच्या मनात दडलेलं असं कुठलं सत्य आहे ज्यापसून कस्तुरी अनभिज्ञ आहे. प्रत्येक कठीण प्रसंगात त्याच्यासोबत असणारी कस्तुरी अचानक आपल्या भावाशी अबोला का धरते ? त्यांच्या नात्यात दुरावा का येतो ? असं काय घडतं या दोघांचे आयुष्य संपूर्णपणे बदलून जाते ? नात्यांना जोडणारी, घट्ट धरून ठेवणारी कस्तुरी असा टोकाचा निर्णय का घेते ?  हे आपल्याला हळूहळू कळेलच. तेव्हा नक्की बघा "कस्तुरी" २६ जूनपासून सोम ते शनि रात्री १०.३० वा. आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment