Thursday, 11 July 2024

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये ६० वर्षांच्या एका रुग्णावर गुंतागुंतीची, मल्टी-स्टेज कार्डियाक आणि व्हस्क्युलर सर्जरी यशस्वीपणे केली गेलीया दुर्मिळ सर्जरीला मिळालेल्या यशाने गुंतागुंतीच्या कार्डिओव्हस्क्युलर आजारांनी त्रस्त रुग्णांना दिला आशेचा किरण

नवी मुंबई, 11 जुलै 2024:  कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईच्या सर्जनने ६० वर्षांच्या एका रुग्णावर अतिशय गुंतागुंतीचीमल्टी-स्टेज कम्बाइन्ड कार्डियाक आणि व्हस्क्युलर सर्जरी यशस्वीपणे पार पाडलीया रुग्णाच्या कोरोनरी आर्टरीज आणि पायांच्या आर्टरीजमध्ये गंभीर ब्लॉकेज होतेत्यामुळे छाती  पायांमध्ये खूप वेदना होत होत्यातपासणीमध्ये दिसून आले कीत्यांना क्रिटिकल कॅल्सिफाईड ट्रिपल व्हेसल हा आजार आणि दोन महत्त्वाच्या रक्तपेशींमध्ये पूर्ण ब्लॉकेज आहेतरुग्णाच्या व्हस्क्युलर सिस्टिममधून अनेक गंभीर ब्लॉकेजेस काढून टाकण्यासाठी कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (सीएबीजीआणि एक्स्टेन्सिव्ह पेरिफेरल आर्टरी बायपास सर्जरी केली गेली.

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलनवी मुंबईचे कन्सल्टन्टकार्डिओव्हस्क्युलर सर्जन डॉ अमजद शेख यांनी सांगितले"रुग्णाच्या संपूर्ण व्हस्क्युलर सिस्टिममध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर ब्लॉकेज होतेत्यामुळे ही केस खूपच आव्हानात्मक होतीरुग्णाच्या डाव्या पायात आणि छातीमध्ये खूप वेदना होत होत्यात्यांना मधुमेह होता आणि ते गेल्या ३० वर्षांहून जास्त काळापासून भरपूर धूम्रपान करत होतेईसीजीअँजिओग्राफी आणि डॉप्लर या तपासण्यांमध्ये आढळून आले कीत्यांच्या कोरोनरी आर्टरीजएओर्टा आणि पायांपर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या आर्टरीजमध्ये गंभीर ब्लॉकेजेस होतेप्राणवायू मिसळलेले रक्त संपूर्ण शरीरापर्यंत घेऊन जाणाऱ्या इन्फ्ररीनल एओर्टामध्ये संपूर्ण ब्लॉकेज आणि डाव्या इंटर्नल कॅरोटिडमध्ये ९०ब्लॉकेज होते."

सुरुवातीला हे रुग्ण सर्जरीसाठी तयार नव्हतेत्यामुळे वैद्यकीय टीमने शरीरावर कमीत कमी चिरा देऊन स्टेन्टिंग करण्याचा प्रयत्न केलापण ब्लॉकेज इतके जास्त आणि गंभीर होते की स्टेंट जाऊच शकला नाहीरुग्णाला समुपदेशन करण्यात आलेत्यानंतर ते सर्जरीसाठी तयार झालेअतिशय दुर्मिळ अशी ही सर्जरी सिंगल स्टेजमध्ये करण्यात आलीहृदयाची संपूर्ण आर्टेरियल बायपास सर्जरी आणि छातीच्या आर्टरीपासून पायांच्या आर्टरीपर्यंतची बायपास सर्जरी एकाच वेळी केली गेलीत्यादरम्यान धडधडत्या हृदयाचे तीन ग्राफ्ट्ससोबत सीएबीजी (कोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टकरण्यात आलेकोरोनरी आर्टरी बायपास ग्राफ्टिंग (सीएबीजीही एक सर्जिकल प्रक्रिया आहेज्यामध्ये हृदयाच्या स्नायूंपर्यंत रक्तपुरवठ्यामध्ये सुधारणा करण्यासाठी ब्लॉक झालेल्या कोरोनरी आर्टरीजच्या चारी बाजूला रक्ताच्या प्रवाहाला रिडायरेक्ट केले जाते.

आर्टरीज ब्लॉक झाल्यामुळे पायांमध्ये रक्ताचा प्रवाह कमी झाला होता आणि पेरिफेरल आर्टरीचा आजार झाला होतात्यावर उपचार करण्यासाठी पायांच्या आर्टरीजचे एक्स्टेन्सिव्ह बायपास केले गेलेया प्रक्रियेमुळे पायांमध्ये रक्त प्रवाह पुन्हा सुरु झालाया गुंतागुंतीच्या प्रक्रियांमध्ये उच्च स्तरावरील सर्जिकल नैपुण्ये आणि अतिशय काळजीपूर्वक स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगची गरज असतेसर्जरीनंतर रुग्णाच्या तब्येतीमध्ये उत्तम सुधारणा होऊ लागलीऑपरेशनच्या दुसऱ्या दिवशी त्यांना एक्स्ट्युबेट करूनत्याच्या दुसऱ्या दिवशी बेडवरुन उठवण्यात आलेफक्त तीन दिवसांत ते अजिबात वेदना  होता नीट चालू फिरू लागलेवैद्यकीय टीमची नैपुण्ये आणि त्यांनी केलेल्या देखभालीबद्दल रुग्णाने त्यांचे आभार मानलेकार्डिओव्हस्क्युलर सर्जरीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे डॉक्टर गुंतागुंतीच्या केसेस देखील यशस्वीपणे बऱ्या करत आहेतयाचे हे एक आदर्श उदाहरण आहे

No comments:

Post a Comment