Sunday, 9 June 2019

BIGG BOSS MARATHI SEASON 2 | WEEKEND चा डाव | रविवार भाग ... कोण जाणार घराबाहेर आज कळणार ...


बिग बॉस मराठी सिझन २ WEEKEND चा डाव महेश मांजरेकरांसोबत !
आज पार पडणार सिझन २ चे पहिले एलिमनेशन...
कोणता सदस्य जाणार घराबाहेर  ? 
  
मुंबई ९ जून, २०१९ : बिग बॉस मराठी सिझन २ मधलं पहिले एलिमनेशन आज पार पडणार आहे... पराग कान्हेरे, अभिजीत केळकर, विणा जगतापमैथिली जावकर,माधव देवचके आणि नेहा शितोळे हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले आहेत. आता या सहा जणांमधून आज कोणाला घरा बाहेर जावे लागेल हे बघणे प्रेक्षकांसाठी रंजक असणार आहे... पराग सेफ झोन मध्ये तर अभिजीत केळकर डेंजर झोन मध्ये असल्याचे महेश मांजरेकर यांनी काल WEEKEND चा डाव मध्ये सांगितले... आज अभिजीत बिचुकले आणि सुरेखाताई पुणेकर यांच्यामधील संभाषणामुळे कार्यक्रमामध्ये बरीच रंगत येणार आहे... महेश मांजरेकर यांनी बिचुकले यांना सुरेखाजींना काही प्रश्न इंग्लिश मध्ये विचारण्यास सांगितले आणि त्यावरून बरीच गंमत झाली... तर घरामध्ये एक टास्कदेखील खेळण्यात येणार आहे. मागील आठवड्यात कोणामुळे घरातील तापमान वाढले यावर घरातील सदस्यांनी विणा आणि शिवानीचे नाव पुढे आणले... आणि त्यामुळे या दोघींना एक टास्क पार पाडवा लागणार आहे,ज्यामध्ये महेश सर घरच्यांना प्रश्न विचारणार आणि ज्याला जास्त वोट मिळतील त्याच्यावर थंडगार पाण्याचा वर्षाव होणार आहे... आता बघुया शिवानी आणि विणा यांपैकी कोणाला या थंडगार पाण्याचा वर्षाव सहन करावा लागेल... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ चा WEEKEND चा डाव आणि कोण जाणार घराबाहेर आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
विणा आणि शिवानी मध्ये झालेल्या वादाचा निकाल लावण्यासाठी सिझनचा पहिला खटला घरामध्ये आयोजित करण्यात आला होता. ज्यामध्ये अभिजीत बिचुकले यांनी शिवानी सुर्वेला निर्दोष ठरवले. परंतु या सगळ्यामध्ये अभिजीत बिचुकले शिवानीच्या बाजूने असल्याचे विणाने व्यक्त केले... विणाला शिक्षा देखील ठोठावण्यात आली... कालWEEKEND चा डाव मध्ये विणाला महेश मांजरेकर यांनी ती कुठे चुकत हे सांगितले तर शिवानीला कठोर शब्दांमध्ये खडसावले... शिवानीचा रागती देत असलेल्या शिव्या,गेम न खेळण्यास  आणि बिग बॉस यांनी देलेली शिक्षा म्हणजेच अडगळीच्या खोलीत रहाण्यास नकार देणे, परागशी तिचे असलेले वागणे यासगळ्यावर महेश मांजरेकरांनी शिवानीला खडे बोल ऐकवले. अशा प्रकारची वागणूक इथे सहन नाही करणारतुझ्या रागावर ताबा ठेव असे देखील तिला सांगितले. याचबरोबर घरात पार पडलेल्या टास्क बद्दल आणि इतर वादांबद्दल देखील इतर सदस्यांशी महेश मांजरेकर बोलले. आता या बोलण्याने शिवानीच्या वागण्यामध्ये आणि इतर सदस्यांदच्या वागण्यामध्ये देखील काही बदल होईल का हे कळेलच...

No comments:

Post a Comment