Wednesday, 19 June 2019

बिग बॉस मराठी सिझन २ - अभिजीत बिचुकलेंचे सुरेखा पुणेकर यांच्याबद्दल काय आहे म्हणणे...


मुंबई १९ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोण कधी कोणाच्या बाजूने बोलेलपाठ फिरतच कोण वार करेल, कोणता सद्य कोणाला भडकवायचा प्रयत्न करेल हे कळणे अवघड असते... अभिजीत बिचुकले सुरेखा पुणेकर यांना घरामध्ये त्यांची आई मानतात त्या आईची जागी आहेत असे त्यांनी बऱ्याचदा बोलून दाखविले आहे. मागील आठवड्यामध्ये झालेल्या WEEKEND चा डाव मध्ये सुरेखा ताईंनी अभिजीत बिचुकले यांची शाळा घेतली. ते कुठे चुकत आहेत, शिवीगाळ करतात यावर त्यांनी आक्षेप घेतला आणि त्यांना खडसावले.
आज नेहाला अभिजीत बिचुकले सुरेखा पुणेकरांबद्दल काही गोष्टी सांगणार आहेत... बिचुकलेंचे म्हणणे आहे, “सुरेखा ताईना मी पहिल्या पासून ओळखतो. त्या वेगळ्याचmentality मध्ये आहेत आणि आपला शो फ्लॉप करण्याच त्यांच्या डोक्यामध्ये आहे... त्या माझ्यासमोर बोलल्या ते किंवा त्या मला उकस्वत होत्याकि यावर माझ्याकडून काही विधान घेऊन पुढे त्यांना ट्वीस्ट करायचं होत मला माहिती नाही...तसेच काल झालेल्या प्रकारावरून रुपालीने माफी मागितली आणि मी देखील माफी मागितली...  आणि हे होत असताना त्या तिथे होत्या आणि त्या म्हणाल्या ही पहिल्यापासून मला नको होती आणि नको आहे”. आता यावर नेहाचे काय म्हणणे पडले कोण नको आहे त्यावर बिचुकले म्हणाले तू नको आहेस त्यांना... आता नेहा यावर विश्वास ठेवेल काय होईल पुढे बघूया आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment