मुंबई ४ जून, २०१९ : आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये दोन सदस्यांमध्ये भाषेवरून उडणार वादाचा भडका... आणि ते दोन सदस्य म्हणजे वीणा आणि वैशाली... वैशालीने रुपालीशी बोलताना केलेल्या शब्दांच्या गैरवापरामुळे वीणा आणि वैशालीमध्ये वादाची ठिणगी उडाली आणि वाद वाढतच गेला... ज्यामध्ये वैशालीने वीणाला बरच काही सुनावले... वीणाने वैशालीला सांगण्याचा प्रयत्न केला कि, तू तुझी भाषा सुधारायला हवी त्यावर “मी इथे काही सुधारायला आलेले नाही” असे वैशालीने वीणाला सांगितले. इतकेच नाही तर तू माझ्या चुका काढू नकोस, हि तुला शेवटची ताकीद आहे असे देखील वैशाली वीणाला म्हणाली... वीणाने वैशालीला सांगण्याचा पुन्हा प्रयत्न केला कि, तू माझ्यावर ओरडू नकोस आणि तुझ्या Warning चा मला काहीही फरक पडत नाही... त्यावर वैशाली म्हणाली, शांत बस, गप्प बस अस तू नको सांगूस मला... हे होत असताना वैशालीने वाईटशब्द उच्चारले तेंव्हा किशोरी आणि वीणाने शिव्या नको असे देखील तिला सांगितले... हे भांडण इतके वाढले कि, वैशाली वीणाला म्हणाली “मी तुझ्या बापाला घाबरत नाही”... त्यावर वीणाने तिला खडसावून सांगितले “माझा बाप काढू नकोस... तुझी लायकी नाही”
आता हे भांडण का झाले ? कोणामुळे झाले ? पुढे काय होईल ? हे आजच्या भागामध्ये कळेलच... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
No comments:
Post a Comment