Tuesday, 4 June 2019

सिद्धीसमोर येणार शिवाचा भूतकाळ ...

मुंबई ४ जून, २०१९ : प्रत्येक नात्याचा पाया हा विश्वास आणि प्रेम असतो... शिवा आणि सिद्धी यांच्यातील नात्यात या दोन्ही गोष्टी नाही... या दोघांमधील भांडण आणि गैरसमज दिवसेंदिवस वाढतच जात आहेत... गौरवच्या हत्येमागे शिवाच आहे अशी पक्की समजूत सिद्धी करून बसली आहे... लग्न होऊन शिवाच्या घरी आल्यापासून सिद्धीला शिवाच्या वडिलांचा आणि त्याच्या बहिणीचा खूप मोठा आधार आहे... या दोघांनाही ती मनातल्या सगळ्या गोष्टी अगदी मोकळेपणाने सांगू शकते... आपल्यातील हेवेदावे आणि भांडण विसरले नसले तरी देखील कधी कधी शिवा आणि सिद्धी एकमेकांना माणुसकी खातर का होईना मदत करतात...
सध्या मालिकेमध्ये शिवाच्या आईने रचलेल्या जाळ्यात सिद्धी अडकणार असे दिसून येते आहे ... शिवाच्या आईच्या सांगण्यावरून घरातील मुल सिद्धीची पुस्तकं  जाळून टाकतात आणि सिद्धीचा समज होतो हे सगळ शिवाने केले आहे... पण नंतर हा गैरसमज दूर होतो... याच संदर्भात सिद्धीशी बोलत असताना शिवाची बहीण सिद्धीला विनंती करते कि, आज दादाला काही बोलू आणि विचारू नका पण यामगचे कारण मात्र ती सिद्धीला सांगत नाही... शिवाच्या भूतकाळात घडलेली अशी कुठली गोष्ट सिद्धीसमोर येणार सिद्धीला काय कळणार त्याचा काय परिणाम होणार ?  हे नक्की बघा जीव झाला येडापिसा रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर...
या सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टीमधून नक्की शिवा – सिद्धीचे नात त्यांना कुठे घेऊन जाईल ?  हे बघणे रंजक असणार आहे... 

No comments:

Post a Comment