सौंदर्याची व्याख्या प्रत्येक व्यक्तीगणिक बदलत असली तरी, सौंदर्याच्या ठराविक चौकटींमुळे खऱ्या सौंदर्याला जाणून घेण्यासाठी आपण मुकत असतो. सौंदर्याची हीच परिभाषा बदलत "मिस अँड मिसेस दादर" च्या माध्यमातून प्रत्येक वयाच्या स्त्रीला स्वतःला शोधायची आणि सिद्ध करायची संधी देणारी अनोखी स्पर्धा शनिवार ८ जूनला दादरमध्ये रंगणार आहे. केवळ सौंदर्य हा निकष न ठेवता स्पर्धेत सहभागी प्रत्येक स्पर्धकांच्या कलागुणांना वाव देत ही स्पर्धा रंगणार आहे. तरुण उद्योजिका मनाली कामत ह्यांच्या प्रयत्नांतून हा उपक्रम उभा राहिला आहे.
व्यक्तीचे सौंदर्य त्याच्या चेहऱ्यापेक्षा आचार विचारातून प्रभावी करत असतं हेच लक्षात घेऊन या स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या ४० जणींचे व्यक्तिमत्व,हजरजबाबीपण, समयसूचकता आणि अंतर्गत गुण इत्यादी गोष्टी पडताळल्या जातील. सदर कार्यक्रमाला अनेक मान्यवर अतिथी तसेच टिव्ही,मालिका आणि सिनेमा क्षेत्रातील सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवर परीक्षक म्हणून लाभणार आहेत.
दादर आणि परिसर म्हणजे मुंबईचं हृदय आणि सांस्कृतिक गाभा... म्हणूनच आठ जून रोजी रंगणारी ही स्पर्धा दादर आणि परिसरात राहणाऱ्या महिलांसाठी व लेकींसाठी एक खास पर्वणी असेल. सौंदर्य, बुद्धिमत्ता, प्रतिभा या कसोट्यांवर उतरत ‘मिस अँड मिसेस दादर’ चा किताब कोण पटकावणार?याची उत्सुकता समस्त दादरकरांना असेलच. गेल्या दोन महिन्यांमध्ये विविध फेऱ्या व कसोट्यांमधून शेकडो सहभागी महिलांमधील ४० जणींची निवड करण्यात आली आहे.
या ४० जणींची विभागणी ४ विभागांमध्ये केली आहे.
मिस दादर : म्हणजे अविवाहित मुली.
मिसेस दादर अ : ज्यांना अद्याप मुलं नाहीत/किंवा नको आहेत अशा स्त्रिया
मिसेस दादर ब : आई असणाऱ्या स्त्रिया
मिसेस दादर क : आजी झालेल्या स्त्रिया
दिनांक – शनिवार ८ जून
वेळ – सायंकाळी ६ ते ९
स्थळ - जे के बँकवेट सभागृह
No comments:
Post a Comment