मुंबई २० जून,२०१९ : बिग बॉसच्या घरामध्ये ग्रुप तयार होणे... दुसऱ्या ग्रुपमधील
सदस्यांच्या विरोधात योजना आखणे, आरोप प्रत्यारोप करणे हे सगळ सुरूच असत... बिग बॉस मराठी सिझन २ मध्ये असाच
एक ग्रुप पहिल्या आठवड्यात तयार झाला आणि ज्याला प्रेक्षकांनी देखील पसंती दिली.
आणि तो म्हणजे पराग, विणा, किशोरी, रुपाली आणि नंतर ग्रुप
मध्ये आलेला शिव... परंतु परागने किशोरी आणि रुपालीला असे सांगितले कि मी या
ग्रुपमध्ये परत नाही येऊ शकत कारण विणाने मला दुखावले आहे... परंतु आता परागने
त्यांच्या ग्रुप मधील तिघी जणींना हे सांगितले आहे कि, मी आपला ग्रुप सोडून कुठेही गेलेलो नाहीये. आपल्या ग्रुपची
संख्या कमी आहे, आणि दुसरीकडे जाऊन हाय नंबर क्रियेट करून आणि मला आपल्या ग्रुपची
जे टार्गेट आहेत त्यांना एलिमनेट करणे आवश्यक आहे म्हणून मी तिकडे गेलो ... मी माझ
काम चालू केले आहे... त्याने हे देखील सांगितले तिथे असताना पराग त्यांच्या
विरोधात खेळणार नाही आणि तुम्हाला नॉमिनेट करणार नाही...
परागला अभिजीत केळकर बिग बॉसच्या घरात नको असून तो त्याच्या नव्या ग्रुपमधील
सदस्यांना घेऊन त्याला नॉमिनेट करण्याची योजना आखत आहे कारण त्याच्या मते त्याने त्यांचा
ग्रुप तोडला आणि अभिजीत मुळेच त्यांच्या ग्रुपमधील सदस्य म्हणजेच शिव नॉमिनेट
झाला... हे काही कॅप्टनसी टास्कच्या दरम्यान झाले ते चुकीचे होते असे त्याचे
म्हणणे आहे. “मी आतल्या गाठीचा नाहीये, आणि मी आपल्या चौघांना फाईनल मध्ये बघतो”
असे देखील तो म्हणाला. पण त्या दुसऱ्या ग्रुपला मी धोका देणार नाही. हे बोलत
असताना विणा उठून गेली, कारण ती दुखावली गेली... आणि परागने सांगितले मला विश्वास
नाही.
पण आता परागची योजना माधव आणि इतर सदस्यांना कळेल का ?
No comments:
Post a Comment