Tuesday, 18 June 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस २४ !



घरात रंगणार एक डाव धोबीपछाड टास्क
नेहा आणि तिच्या टीमचावैशालीवर आरोप ?
मुंबई १९ जून, २०१९ : कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य “एक डाव धोबीपछाड”. ज्यामध्ये टीम A आणि टीम Bअशा टीम करण्यात आला आहेत. नेहा शितोळे टीम A आणि विद्याधर जोशी टीम B चे मॅनेजर असणार आहेततर वैशाली म्हाडे संचालक असणार आहे... आता या टास्क मध्ये कोण जिंकणार ? हे बघणे रंजक असणार आहे. या आठवड्यामध्ये सही रे सही या टास्कमध्ये विणा जगताप, विद्याधर जोशी, सुरेखा पुणेकर, अभिजीत  बिचुकले आणि पराग कान्हेरे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेमध्ये नॉमिनेट झाले तर शिवला घरातील सदस्यांनी नॉमिनेट केल्याने तो देखील थेट नॉमिनेट आहे. तर हीनाचा घरातील पहिला आठवडाआणि वैशाली घराची कॅप्टन असल्याने त्याया आठवड्यात सेफ आहेत.... कोण घराबाहेर जाईल ? कोणाला प्रेक्षकांची मते मिळणार ? हे कळेलच...
एक डाव धोबीपछाड या टास्कमध्ये नेहा आणि विद्याधर मॅनेजरअसल्याने स्वत:ची टीम कशी जिंकेल याचा चातुर्याने कसा मार्ग काढतील आणि उपाय काढतील ? काय डील करतील ? आणि कसे दुसऱ्या टीमला या टास्कमध्ये हरवतील हे आजच्या टास्क मध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे... तसेच टीम Aम्हणजेच नेहाच्या टीमला वैशाली म्हाडे म्हणजेच टास्कची संचालिका हिच्यावर संशय आहे आता नेहा आणि त्यांच्या टीमचे असे का म्हणणे आहे ? वैशालीने असे खरच केले का ? आज कळेलच...
काल शेरास सव्वा शेर या टास्कमध्ये रुपाली भोसले आणि अभिजीत बिचुकले मध्ये कडाक्याचे भांडण झाले... अभिजीत बिचुकले यांनी मला घराबाहेर जायचे आहे असे देखील त्यांनी सांगितले. कोण पहिल्या नंबरवर रहाणार यावरून किशोरी आणि अभिजीत केळकर यांच्यामध्ये देखील वादावादी झाली. तर नेहा आणि सुरेखा ताईमध्ये देखील जेवणावरून बरच वाद झाला आणि नेहाने वैशालीला सांगितले तिला किचन टीममध्ये रहायचे नाही... तर परागने किशोरी, रुपाली यांचा ग्रुप सोडण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगितलेआणि आता परत तुमच्या ग्रुपमध्ये येण अशक्य आहे असे देखील तो त्यांना तो म्हणाला. रुपाली आणि किशोरीने त्याला बरच समजविण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या निर्णयावर ठाम राहिला...
आज घरामध्ये काय घडेल हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment