Monday, 10 June 2019

बिग बॉस मराठी सिझन २ दिवस १५ ! बिग बॉस सुनवणार घरातील सदस्यांना शिक्षा...घरामध्ये रंगणार बिग बॉस मिठाईवाला नॉमिनेशन टास्क

बिग बॉस मराठी सिझन २ दिवस १५ !
बिग बॉस सुनवणार घरातील सदस्यांना शिक्षा
घरामध्ये रंगणार बिग बॉस मिठाईवाला नॉमिनेशन टास्क 
 
मुंबई १० जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल सिझन २ ची पहिली सदस्य मैथिली जावकर एलिमनेट झाली... या आठवड्यामध्ये घरातील सदस्य कोणाला नॉमिनेट करणार प्रेक्षक कोणाला वाचवणार आणि घरात कोणते टास्क रंगणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे... आज घरातील सदस्यांवर बिग बॉस यांनी नाराजगी व्यक्त केली आहे... कारण सदस्य बिग बॉसच्या घराच्या नियमांचे वारंवार उल्लंघन करताना दिसत आहेत...  बिग बॉसच्या घराचा महत्वाचा नियम म्हणजे कोणताही नियम न मोडणे... सदस्यांनी बिग बॉसच्या वारंवार दिलेल्या सूचनांनंतर देखील हे नियम तोडलेजसे मराठी भाषेचाच वापर करणे, माईक घालून घरामध्ये वावरणे, कुजबुज न करणे, बिग बॉसच्या आदेशानंतर देखील लिव्हिंग एरियामध्ये जमण्यास उशीर करणेंकिंवा दिवसा न झोपणे... घरातील सदस्यांनी ही गोष्ट गांभीर्याने न घेतल्यामुळे आज सगळे सदस्य बिग बॉस यांनी दिलेल्या शिक्षेस पात्र असणार आहेत... आता बिग बॉस सदस्यांना कोणती शिक्षा देणार हे आज कळेलच... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
याचसोबत आज सदस्य तिसऱ्या आठवड्यामध्ये पदार्पण करत आहेत... नियमभंगामुळे सदस्यांनी कॅप्टन्सीमुळे मिळणारी इम्युनिटी गमवली आहे... बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार साप्ताहिक नॉमिनेशन आणि कॅप्टनसी कार्य... “बिग बॉस मिठाईवाला” हे नॉमिनेशन कार्य रंगणार असून यामध्ये प्रत्येक सदस्याने घराबाहेर जाण्याच्या प्रक्रीयेसाठी २ सदस्यांना नॉमिनेट करायचे आहे.
आता बघुया सदस्य कोणाला नॉमिनेट करतील आणि कॅप्टनसी टास्क कोणामध्ये रंगेल... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन २ आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment