Thursday, 20 June 2019

बिग बॉस मराठी सिझन २ – दिवस २५ ! शिव VS पराग आणि नेहा पराग आणि विणामध्ये वाद


 
मुंबई २० जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरात सुरु असलेल्या एक डाव धोबीपछाड या साप्ताहिक कार्यामध्ये बरीच भांडणवाद विवादआरोप – प्रत्यारोप सुरु आहेत... याच टास्कमध्ये जिंकण्यासाठी बिग बॉस यांनी विरोधी टीमला टास्कमध्ये हरविण्यासाठी सामदाम दंडभेद याचा उपयोग चातुर्याने करायला सांगितले... तसेच टास्कमध्ये दिलेली ऑर्डर एकाच टीमने पूर्ण करायची आहे हे देखील निक्षून सांगितले. हे सांगितल्याने काल परागने स्वत:लाच मॅनेजर बनवले आणि त्यामुळे दोन्ही टीममध्ये वादाची ठिणगी उडली... या टास्कमध्ये मॅनेजरमध्ये झालेल्या डील प्रमाणे विणाच्या टीमने परागच्या टीमला approve झालेले २ कपडे द्यायचे आहेत... परंतु विणाच्या टीमने यावर उत्तम योजना आखली आहे. टीम परागला सांगणार आहे आमच्या टीमचा मॅनेजर सुट्टीवर आहे आणि यावरूनच विणा – परागमध्ये वाद होणार आहे.
याच टास्क दरम्यान पुन्हा शिव विरुध्द नेहा हे दृश्य दिसणार आहे... ज्यामध्ये शिव साम, दाम दंडभेद हे मोठ्या आवाजात बोलल्याने समोरच्या टीमची चिडचिड झाली आणि हेच होत असताना परागचा राग अनावर झाला आणि तो देखील शिवला टक्कर देत सामदाम दंडभेद असे मोठ्या आवाजात बोलू लागला... परंतु यामुळे परागलाच त्याचाच त्रास तर होणार नाही ना हे आजच्या भागामध्ये कळेलच... घरात होणाऱ्या टास्क मध्ये सदस्यांनी स्वत: संयम ठेवणे अत्यावश्यक असते परंतु हे सदस्यांना कधी समजणार कोणास ठाऊक ?
या साप्ताहिक कार्यामध्ये कोणती टीम विजेती ठरेल हे जाणून घेण्यासाठी बघत रहा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.  

No comments:

Post a Comment