मुंबई २३ जून, २०१९ : बिग बॉस मराठीच्या WEEKEND चा डावमध्ये महेश मांजरेकर यांनी काही सदस्यांना त्यांच्या
चुका दाखवून दिल्या. इतकी भांडणारी लोक मी संपूर्ण जगात पहिली नाहीत असे महेश
मांजरेकर म्हणाले... तर गेल्या आठवड्यात सगळ्यात चांगली खेळणारी सदस्य म्हणून
नेहाचे नाव घेतले. एक डाव धोबीपछाड यासाप्ताहिक कार्या दरम्यान सदस्यांनी घातलेला राडा
बद्दल देखील सदस्यांची कानउघडणी केली. या कार्यात टीम B विजेती ठरली असे मला वाटत नाही असे महेश मांजरेकर सांगितले.
शिव घरात सोडलेला वळू आहे... कॅप्टनसी टास्कसाठी शिवची आणि वैशालीची एक डाव
धोबीपछाड या कार्या दरम्यान झालेल्या चुकीच्या वर्तणुकीबद्दल शाळा घेतली.नेहाने या
सगळ्या झालेल्या प्रकरणाबद्दल तिची बाजू मांडली... यामध्ये सुरेखाताई काहीतरी
बोलतील असे मला वाटले असे नेहा म्हणाली.. त्यावर महेश मांजरेकर म्हणाले “सुरेखाताई
शनिवार ते शनिवार बोलतात”. तर, नॉमिनेशन टास्क दरम्यान झालेल्या वादावरून देखील
घरातील पुरुषांना झापले.. “मी या कार्यक्रमाचा होस्ट आहे मला लाज वाटायला लावू
नका” असे महेश मांजरेकरांनी घरातील सदस्यांना बजावले... आज WEEKEND चा डाव मध्ये घरातील
कोणी एक सदस्य बाहेर जाणार ... आता कुठला सदस्य घराबाहेर जाईल ? हे नक्की बघा बिग
बॉस मराठीच्या WEEKEND चा डावमध्ये आज रात्री
९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
शिव आणि विणा मध्ये हीना फूट पाडत आहेत आणि हा बिचुकलेंचाplan आहे अशी चुगली विणाच्या
चाहत्याने केली ज्याला हिनाने साफ नकार दिला... तर पराग – रुपाली, विणा – शिव तर सुरेखाताई आणि
विद्याधर जोशी यांनी सुंदर डान्स सादर केला. तसेच महेश मांजरेकर यांनी काही म्हणी
सांगितल्या त्या कोणत्या सदस्याला लागू पडतात हे सदस्यांना सांगायचे आहे... “हातच
सोडून पळत्याच्या मागे” यावर विणाने परागचे नाव घेतले आणि परागने विणाचे नाव
घेतले... तर वैशालीने तिच्या मधुर आवाजात नाम गुम जायेगा हे गाणे म्हंटले.अजून
काय काय घडले हे जाणून घेण्यसाठी बघा आजचा भाग
No comments:
Post a Comment