Thursday 15 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ८१ कोणची टीम विजयी ठरणार ? शिवानीच्या कवितेमुळे सदस्य झाले भाऊक


मुंबई १५ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीमध्ये कालपासून जुना गडी नवं राज्य हे साप्ताहिक कार्य सुरू आहे. मेघा आणि रेशम या राज्याच्या दोन राण्या तर सुशांत राजा आहे आणि घरातील सदस्य रहिवाशी आहेत. सदस्य तीन टिम्समध्ये विभागले आहेत... आज बिग बॉस रहिवाश्यांना विजयी टीमचा झेंडा गार्डन एरियामध्ये रोवायला सांगणार आहेत... बघूया यामध्ये कोण यशस्वी ठरेल हीना की शिव ? काल सुरू असलेल्या टास्कमध्ये आरोहने कार्य संपल्यानंतर झेंडे फाडले आणि लपवले त्यामुळे सदस्यांचे म्हणणे पडले त्याला या टास्कमधून बाद करा... मेघा आणि आरोहचे म्हणणे होते किशोरीताई असे नाही करू शकत. पण, कार्याच्या संचालिका किशोरी शहाणे यांनी बिग बॉस यांना त्यांचा निर्णय सांगितला आणि आरोहला बाद केले. बघूया आज साप्ताहिक कार्यामध्ये काय होणार ... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये आज रात्री ९.३० वा.आपल्या कलर्स मराठीवर.
शिवानी सुर्वे आज एक कविता सादर करणार आहे... शिवानीने सादर केलेल्या कवितेनंतर सगळेच खूप भाऊक झाले.... तिचे म्हणणे आहे आता १२ आठवडा संपत आला आहे आणि त्यासाठी मी एक कविता सादर करणार आहे, गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना...
या भाऊक क्षणानंतर बिग बॉस यांनी लावलेल्या गाण्यावर घरातील सदस्यांनी खूप धम्माल मस्ती केली आणि डान्स केला. आज घरामध्ये अजून काय काय घडले ? काय झाले टास्कमध्ये ? हे नक्की बघा बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये आज रात्री ९.३० वा.आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment