Friday 16 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ८२ ! बिग बॉसच्या घरात रक्षाबंधन सेलिब्रेशन

 
मुंबई १६ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना त्यांच्या घरची आठवण येत असणार हे नक्की कारण काल रक्षा बंधन होते... प्रत्येक भाऊ आणि बहिणीसाठी हा सण खास असतो. आज बिग बॉस मराठीच्या घरात रक्षाबंधन पार पडणार आहे... काही दिवसांपूर्वी शिवची आई घरामध्ये येऊन गेली होती. त्यांचे म्हणणे होते शिवने घरातील सगळ्या मुलींना राखी बांधावी... आज घरामध्ये अभिजीत बिचुकले, आरोह आणि शिवला राखी बांधणार आहेत. याचप्रसंगी शिवला चिडवण्यासाठी शिवानीने शिवला विचारले आज सगळेच शिवला राखी बांधणार आहेत का ? या प्रश्नाकडे शिवने सोयिस्कररित्या दुर्लक्ष केले... आरोहने सगळ्यांना विचारले काही गिफ्ट हवी असतील सांगा... सगळ्यांसाठी हा क्षण भाऊक करणारा होता... सगळ्या सदस्यांनी छान तयार होऊन, सगळे हेवेदावे विसरून उत्साहात, आनंदात हा सण साजरा केला...

No comments:

Post a Comment