Monday, 5 August 2019

बिग बॉस मराठी सिझन 2 – दिवस ७१ ! घरामध्ये रंगणार खांब खांब कॅप्टनसी कार्य आरोह कोणाला म्हणाला चिटर ?


 
मुंबई ५ ऑगस्ट, २०१९ : बिग बॉस मराठीच्या घरामधून काल रूपाली भोसले बाहेर पडली... आता घरामध्ये टॉप ९ सदस्य उरले आहेत... अभिजीत केळकर, शिव ठाकरे, शिवानी सुर्वे, वीणा जगताप, नेहा शितोळे, अभिजीत बिचुकले, किशोरी शहाणे, आरोह वेलणकर, हीना पांचाळ ... या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार? कोण घराचा कॅप्टन बनणार ? हे बघणे आता अजूनच रंजक झाले आहे... आज घरामध्ये खांब खांब हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे. कार्यामध्ये सदस्यांमध्ये वाद – विवाद नाही झाले तर नवलच...तेंव्हा बघूया हा टास्क कसा रंगला ? कोण बनणार घराचा नवा कॅप्टन ? तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.
शिव आणि आरोहचे एकमेकाशी फार काही पटत नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे... टास्क दरम्यान शिव आणि आरोह मध्ये बाचाबाची होणार आहे... खांबावर पहिले कोणी स्वत:चे नाव लावले यावरून दोघांमध्ये वाद रंगला आणि ज्यामध्ये आरोह शिवला चिटर म्हणाला आहे... आता नक्की कोण चिडीचा डाव खेळला ?कोणी नाव पहिले लावले ? हे आजच्या भागामध्ये कळेलच... तेंव्हा नक्की बघा बिग बॉस मराठी आज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

No comments:

Post a Comment