Thursday 15 August 2019

झी टॉकीजवर 'रंपाट' प्रीमियर!!!

एक दशकाहून अधिक काळ, प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी मराठी चित्रपट वाहिनी, अर्थातच आपले सगळ्यांचे लाडके 'झी टॉकीज' हे दर्जेदार मराठी चित्रपटांचा खजिना नेहमीच प्रेक्षकांसाठी घेऊन येत असते. जुन्या व नव्या चित्रपटांचा सुंदर खजिना, विविध नाटकं, विनोदी कार्यक्रम अशी छान मेजवानी या वाहिनीवर रोज अनुभवायला मिळते. आठवड्यातील सुट्टीच्या दिवशु, म्हणजेच रविवारी, झी टॉकीज आपल्यासाठी घेऊन येतं, धमाकेदार 'वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर'! येत्या रविवारी, म्हणजेच १८ ऑगस्टला, 'रंपाट' हा असाच एक 'सुपरफास्ट' चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
'रंपाट' हा चित्रपट म्हणजे, अभिनय क्षेत्रात आपली छाप पाडू इच्छिणाऱ्या दोन तरुणांची कथा आहे. कोल्हापूर शहरातील मल्ल असलेली मुन्नी आणि फिल्मी आईचा फिल्मी मुलगा मिथुन, ही या सिनेमातील मुख्य पात्रं आहेत. लहानपणापासून दोघांचीही अभिनयातील सुपरस्टार होण्याची मनिषा आहे. आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोघेही मायानगरी मुंबईत येतात आणि चित्रपटाला सुरुवात होते. अनेक बऱ्या-वाईट प्रसंगांना तोंड देत ते आपली वाटचाल सुरू ठेवतात. त्यांच्या या संघर्षाच्या कहाणीतून, आजच्या तरुणांना अनेक गोष्टी शिकायला मिळतील. छोट्यामोठ्या यशाने हुरळून न जाता, पुढचा विचार करून, आपल्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करत राहण्याची शिकवण या सिनेमातून तरुणांना मिळेल. यशाचा मार्ग हा कधीच सोपा असत नाही. यश मिळवणे हे सहजसाध्य काम मुळीच नाही. या मुन्नी आणि मिथुन यांनी आपली योग्य वाट शोधली आहे का? त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यात ते यशस्वी होतील का?
हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका, एक 'रंपाट' वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर; रविवार १८ ऑगस्ट रोजी, दुपारी १२ व संध्याकाळी ६ वाजता, फक्त आपल्या लाडक्या झी टॉकीजवर!!! 

No comments:

Post a Comment