Monday 4 November 2019

५० भागांची 'अल्टी पल्टी'

झी मराठी वाहिनी नेहमीच वेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांसाठी सादर करतेसामान्य लोकांना फसवणाऱ्या ठगांना गंडवण्यात कायम तत्पर असलेल्या जोडीची गोष्ट असलेली 'अल्टी पल्टीसुमडीत कल्टीहि मालिका झी मराठीवर नुकतीच रसिकांच्या भेटीस आली आणि अगदी सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद देखील दिलाआता या मालिकेने ५० भागांचा पल्ला गाठलाहा यशस्वी ५० भागांचा माईलस्टोन मालिकेमधील कलाकरांनी आणि संपूर्ण टीमने केक कटिंग करून साजरा केला.
इतकंच नव्हे तर सर्वांची लाडकी शीतली म्हणजे अल्टी पल्टी मधील पल्लवीअभिनेत्री शिवानी बावकर हिने रसिक प्रेक्षक आणि चाहत्यांचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट देखील अपलोड केलाप्रेक्षकांनी मालिकेवर केलेल्या प्रेमाबद्दल शिवानीने सगळ्यांचे आभार मानलेहि मालिका असंच प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहील यात शंकाच नाही.

No comments:

Post a Comment