Thursday 2 January 2020

तुझ्यात जीव रंगला मधील कलाकारांनी घेतली जेष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदींची भेट

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगलाया लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहेया मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतातया मालिकेवरयातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतातरांगडा 'राणादाआणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनलेया मालिकेच्या कथानकाने नुकतीच  वर्षांची लीप घेतलीया मालिकेच्या वेळेत देखील बदल झालेतरी देखील प्रेक्षकांचं या मालिकेवरील प्रेम काही कमी झालं नाहीनुकतंच या मालिकेने १००० भागांचा यशस्वी टप्पा पार पडलाप्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा यामुळे तुझ्यात जीव रंगला या मालिकेने १००० भागांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला.
या मालिकेचे आणि त्यातील कलाकारांचे लाखो चाहते आहेतज्येष्ठ अभिनेत्री ‘सुलोचना दीदी’ यांनी या कलाकारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होतीसुलोचना दीदी हि मालिका नियमितपणे बघतात आणि त्यातील कलाकारांना भेटण्याची त्यांची तीव्र इच्छा होती,  म्हणून नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी या कलाकारांनी सुलोचना दीदींची त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतलीराणादापाठक बाईलाडू या सगळ्यांना भेटून सुलोचना दीदींना आनंद झाला आणि या भेटीने हे कलाकार देखील भारावून गेले.  तुझ्यात जीव रंगला या मालिकेचं चित्रीकरण कोल्हापूरमध्ये होतं आणि सुलोचना दीदी या स्वतः देखील कोल्हापूरच्या आहेत त्यामुळे कलाकारांशी गप्पा मारताना कोल्हापूरचे अनेक किस्से आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

No comments:

Post a Comment