झी टॉकीजवर रंगणार ‘फत्तेशिकस्त'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वात धाडसी आणि प्रख्यात राज्यकर्त्यांपैकी एक आहेत. लोकांच्या हृदयात महाराजांचे अढळ स्थान आहे. ते केवळ स्वराज्याचे संस्थापक नव्हते तर एक उल्लेखनीय राजे आणि सच्चे-धाडसी सैनिक देखील होते. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित फत्तेशिकस्त हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांनी लढलेल्या लढायांपैकी एका लढाईवर आधारित आहे. १६ ऑगस्ट रोजी झी टॉकीज हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. पुण्यात मुघलांसोबत झालेल्या अनोख्या लढाईवर हा चित्रपट चित्रित केलेला आहे. शाहिस्तेखान पुण्यात तळ ठोकून बसला असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी तुटपुंज्या मावळ्यांच्या साहाय्याने पुण्यातील लाल महालावर हल्ला करून महाकाय शाहिस्तेखानाची बोटे छाटली. हा हल्ला म्हणजे फक्त एक शौर्य गाथा नसून बलाढ्य मुघल सैन्याला मारलेली चपराक होती. भारतातील सर्वात पहिली 'सर्जिकल स्ट्राईक' म्हणून या घटनेकडे बघितले जाते. मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अनुप सोनी, अंकित मोहन, मृण्मयी देशपांडे या सारख्या दर्जेदार कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. देवदत्त मनीषा बाजी यांनी संगीतबद्ध केलेले संगीत आणि संत तुकारामांच्या अभंगांवर आधारित गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात.
फत्तेशिकस्त बघताना प्रेक्षक नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात हरवून जातील आणि प्रत्येकाला महाराजांच्या इतिहासातुन कोणत्याही संकटाशी लढण्याची ताकद मिळेल यात शंका नाही. तर पाहायला विसरु नका फत्तेशिकस्त १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ आणि संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.
No comments:
Post a Comment